आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inspiring: दोन्ही हात नसतानाही अशी पळवतात स्कूटर... परिसरात सर्वांसाठी प्रेरणादायक सरकारी अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालोद - मजबूत इच्छाशक्ती आणि काही मिळवण्याची जिद्द असल्यास कुठलाही अडथळा आपल्याला यशापासून दूर करूच शकत नाही. छत्तिसगडच्या बालोद शहरात राहणारे बसंत हिरवानी यांनी हीच गोष्ट सिद्ध केली आहे. स्थानिकांमध्ये त्यांच्या यशोगाथेच्या चर्चा आहेत. बसंत यांना दोन्ही हात नाहीत. परंतु, त्यांच्या टॅलेन्ट आणि जिद्दीने सर्वांनाच प्रेरणा दिली. ते एका कार्यालयात काम करतात. सुरुवातीला त्यांना ऑफिसला जाण्यासाठी दुसऱ्यांची मदत किंवा लिफ्ट घ्यावी लागत होती. परंतु, आज ते स्वतः आपल्या स्कूटीवर कामाला जातात. त्यांच्या या कल्पक बुद्धीचे सगळेच फॅन झाले आहेत. 


अशी आहे त्यांची ही गाडी...
> बसंत हिरवानी यांच्यासाठी हे स्कूटर तीन मेकॅनिकांनी मिळून तयार केले आहे. हे गाडी ते हात नसतानाही चालवू शकतात. बसंत यांनी सांगितले, की स्टियरिंग लावलेले असल्याने स्कूटर चालवण्याची मजाच न्यारी आहे. त्यांनी स्टियरिंगमध्ये हॉर्न लावले आहे. पायाच्या मदतीने ते इंडिकेटर लाइट, सेल्फ स्टार्टचे बटन दाबतात. ब्रेक आणि क्लच सुद्धा पायांनी नियंत्रित करतात.
> बसंत 1983 पासून तहसिल कार्यालयात सहाय्यक ग्रेड 2 पदावर कार्यरत आहेत. त्यांची जिद्द पाहून कुणीही पहिल्या भेटीतच त्यांचा फॅन होतो. सरकारी अधिकारी असलेले बसंत आपल्या पायांनी लिहितात. पायाने लिहूनही त्यांचे अक्षर अतिशय सुंदर, वळणदार आणि स्पष्ट आहे. कार्यालयातील फायलींवर सही करणे, सील लावणे, रेकॉर्ड मेनटेन करणे ही सर्वच कामे ते पायाने करतात. एकीकडे, समाजात असेही लोक आहेत की जे कुठलेही काम टाळण्यासाठी किंवा आपल्या अपयशासाठी छोटी-छोटी कारणे देतात. तर दुसरीकडे बसंत आहेत, ज्यांनी कधीही आपल्या शारीरिक क्षमतांचे भांडवल केले नाही. उलट ते असंख्य दिव्यांगांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...