आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story: 7 वर्षांपूर्वी भारतात फिरायला आली फ्रान्सची तरुणी, गाइडच्या प्रेमात पडली, लग्नानंतर कुटुंबासाठी बांधतेय असे घर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांडू (एमपी) - 7 वर्षांपूर्वी फ्रान्सच्या पॅरिस शहरातून मध्य प्रदेशातील मांडू येथे पर्यटनासाठी आलेली मारी (33) आता भारतीय संस्कृतीशी एकरूप झाली आहे. येथील फ्रेंच भाषेचा गाइड धीरज याच्याशी तिने लग्न करून भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मारी शिक्षिका आहे. पॅरिसमध्ये तिचे वडील डॉक्टर, तर आई शिक्षिका आहे. मारी थोडीफार हिंदीत बोलते. साडी आणि सलवार सूट वापरताना तिला खूप अभिमान वाटतो. 

 

मांडूमध्ये बसून फ्रान्सच्या मुलांना देते ऑनलाइन शिकवणी
स्वत: शिक्षिका असल्याने मारी पॅरिसच्या मुलांना ऑनलाइन शिकवते. नोट्स पाठवते. तिची दोन मुले काशी (५) व नील (३) यांना हिंदी व फ्रेंच दोन्ही भाषा शिकवते. त्यांची देखभाल करत त्यांनाही शिकवते. मी मुलांना दहा वर्षांपर्यंत शाळेत पाठवणार नाही. कारण त्यांना काही गोष्टी शिकवणार आहे. नंतरच शाळेत पाठवीन, असे मारी म्हणते. 

 

साडी, सलवार सूट घालते, गावकऱ्यांनीही स्वीकारले
मारी पूर्णपणे भारतीय संस्कृतीशी एकरूप झाली आहे. ती बहुतांश वेळा सलवार सूट घालते, परंतु काही कार्यक्रम असेल तर साडीही परिधान करते. मारी म्हणाली की, भारतीय संस्कृतीची प्रतीक असलेली साडी घालून मला सुखद अनुभव मिळतो. तर तिची मुलेही इतर मुलांसोबत पारंपरिक खेळ खेळतात. फक्त ती जेवणाकडे विशेष लक्ष देते. जेणेकरून आरोग्य टिकून राहावे. यासाठी ती साध्या जेवणासोबत साधा नाश्ता, सॅलड आणि कच्च्या भाज्या, अंकुरित कडधान्ये, बिनातेलाचे, बिनातुपाचे अन्न बनवते. मुलांची आरोग्याची काही तक्रार असेल तर ती फ्रान्समध्ये आपल्या वडिलांशी संपर्क करून त्यांना विचारून उपचार करते.

 

पतीसोबत करते बांधकामात मदत
सध्या मांडूमध्ये ती 4 खोल्यांचे घर बांधते आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ती पतीसोबत विटा व वाळूची टोपली उचलून घराच्या बांधकामात मदत करते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...