आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज डेस्क - कर्नाटकातील बेल्लारी शहरातील 17 वर्षीय सृष्टीची वजन घटवण्याची कहाणी मोठी प्रेरणादायक आहे. एकदा बस स्टॉपवर एका मुलाने सृष्टीच्या शरीरावरुन तिला हिणवले होते. त्यामुळे सृष्टीला खूप वाईट वाटले आणि तिने वजन घटवण्याचा निर्धार केला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सृष्टीने Gym मध्ये न जाता वजन कमी केले.
हळूहळू सुरू केल्या या गोष्टी
> सृष्टीने जॉगिंग सुरू केली. तिच्या घरासमोर असलेल्या मैदानात ती दररोज फिरू लागली. सुरुवातीला अर्धा तास नंतर हळूहळू तिने जास्त वेळ जॉगिंग सुरू केली.
> सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सृष्टीने जवळपास 9 महिने सातत्याने जॉगिंग केली.
आहाराचे वेळापत्रकही बदलले
> सृष्टीने तिचा आहार पूर्णपणे बदलला. तिने सकाळी आहारात इडली, पोहे, उपमा यासारखा हलका आहार घेणे सुरू केले.
> दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, डाळ आणि भात हे जेवण सुरू केले.
> रात्रीच्या जेवणात तिने भात खाणे बंद केले.
> ती रात्रीचे जेवण 8 वाजेच्या आधीच करू लागली.
> गोड पदार्थ, जंकफूड, तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले.
> या सर्व गोष्टींमुळे सृष्टीने 9 महिन्यांत 30 किलो वजन कमी केले.
वजन वाढू नये यासाठी सृष्टी घेते ही काळजी
> सृष्टीने सांगितले की, डॉक्टरांनी तिला अंडरवेट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने उंचीच्या प्रमाणात आणखी 8 किलो वजन वाढवले होते. आता तिचे वजन 52 किलो आहे.
> सृष्टी वजन वाढू नये यासाठी हलका आहार घेऊन दररोज जॉगिंग करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.