आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअप्प ग्रुपवर मिळालेल्या प्रेरणेतून दाम्पत्याने स्वतःत केला असा बदल की पाहणारा प्रत्येक जण होतोय हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डेटा इंटेलीजेंस डेस्क - राजस्थानच्या सिरोही येथील आदित्य आणि गायत्री शर्मा या मारवाडी दाम्पत्याने स्वतः केलेल्या बदलामुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आदित्यने 6 महिन्यांत 20 किलो तर त्यांच्या पत्नीने 4 महिन्यांत 10 किलो वजन कमी केले. याचे वैशिष्ट्य असे की, त्यांना वजन कमी करण्याची कल्पना एखाद्या प्रशिक्षकाने नाही तर व्हॉट्सअप्प ग्रुपमधून मिळाली होती. 

 

शर्मा व्हॉट्सअप्पवर फिटनेसबाबत सल्ला देणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी झाले. यानंतर फिटनेससाठीच्या त्यांच्या जिद्दीने आज ते फिटनेस कोच आहेत. तसेच त्यांनी आता स्वतःची जिम सुरु केली आणि तब्येतीसोबत पैसे देखील कमवत आहेत. आदित्य यांनी दैनिक भास्कर प्लस अॅपशी बोलताना आपला अनुभव शेअर करत काही महत्वाच्या टीप्स देखील दिल्या आहेत.  


कसा केला स्वतःत इतका बदल? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

जिम ज्वॉइन केली पण कार्डियो, रनिंग केली नाही
आदित्यने 2015 मध्ये वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. योग्य सल्ला भेटल्यानंतर त्यांनी जिम ज्वॉइन केली. रोज दीड ते दोन तास जिममध्ये घालवत होते. यादरम्यान कार्डियो, रनिंग आणि अॅब्सवर लक्ष न देता वेट ट्रेनिंग केली. आदित्यचे म्हणणे आहे की, वजन उचलल्यामुळे आपोआप अॅब्स बनतात. तसेच जस-जसे फॅट कमी होते तेव्हा मसल्स विकसित होतात. मसल्स विकसिक होण्यासोबत आपला स्टेमिना देखील वाढत असतो. आदित्य वजन कमी करण्यासाठी इतरांना देखील कार्डियो ऐवजी वेट ट्रेनिंगचा सल्ला देतात. 

 

जिममध्ये कोणत्या प्रकारचा व्यायाम करतात
एक दिवसात दोन बॉडी पार्टचा व्यायाम करतात. एक दिवस बॅक-बायसेप, दुसऱ्या दिवशी चेस्ट-ट्रायसेप आणि तिसऱ्या दिवशी शोल्डर. यासोबतच कंपाउंड लिफ्ट, स्क्वाट्स, डेड लिफ्ट करत असतात. आठवड्यातील एक दिवस शरीराला आराम देतात. वेट ट्रेनिंग करताना सुरुवातील कमी वजनाने व्यायाम केला. क्षमता वाढल्यानंतर वजन उचलण्यास सुरुवात केली. आता ते 80 किलोपर्यंत वजन उचलू शकतात. 


कसा घेतात डायट?

> योग्य आहाराशिवाय शरीर तंदरुस्त करता येत नसल्याचे आदित्य शर्माचे म्हणणे आहे. 

 

जाणून घ्या त्यांच्या डायटविषयी 

> ब्रेकफास्ट : सोयबीन आणि तांदुळ शिजवून खातात.  

> लंच : पालक, पनीर आणि दही घेतात. पालक आणि पनीर मिळून वेगवेगळ्या भाज्या तयार करतात पण लंचमध्ये हेच आहार घेतात. 


> डिनर : सोयाबीन आणि भातासोबत सलाड खातात. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पोळी खाल्ली नाही. कारण पोळी त्यांच्या शरीराला सहन होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांना पोळी खाण्यापासून काही अडचण नाही. ते लोक पोळी खाऊ शकतात. 

> प्रोटीन : दोन वेळ एक-एक चमचा प्रोटीन पावडर पाण्यासोबत घेतात. आदित्यच्या प्रोटीन शरीरासाठी सर्वाधिक गरजेचे असते. तुम्ही जर जिममध्ये जात असाल तर जितके वजन आहे त्याच्या दुप्पट प्रोटीन घेणे गरजेचे आहे. 


> जिमला जाण्यापूर्वी : फक्त ब्लॅक टी घेतात.


जिम करणाऱ्यांसाठी काय दिला सल्ला 

> आपले ध्येय निश्चित करा. लठ्ठ असाल तर फॅटलेस होण्याचे ध्येय बाळगा, दुबळे असाल तर मस्क्यूलर होण्याचे ध्येय निश्चित करा. 

> वरील दोन्ही स्थितीमध्ये व्यायाम करावाच लागणार आहे. यासाठी जिम ज्वॉइन करा. 

> आपल्या शरीरानुसार डायट ठरवा. डायट विषयी समजत नसेल तर एखाद्या डायटीशियनचा सल्ला घ्या. योग्य डायट आणि व्यायामानेच योग्य शरीर बनते. 

> शरीर बनवायचे असेल तर ड्रिंक, जंक फूड आणि सिगारेट पूर्णपणे बंद करा.

बातम्या आणखी आहेत...