• Home
  • News
  • Instead of anger innocence is in on the Karan's face, film is away from the story and close to the emotions.

समीक्षण / पल पल दिल के पास : रागातही निरागस भाव दिसले करणच्या चेहऱ्यावर, कथेपासून दूर आणि भावनिकतेच्या जवळ आहे चित्रपट 

सध्याची पिढी प्रेमासाठी कोण- कोणत्या मर्यादा ओलांडते यावर हा चित्रपट अवलंबून आहे 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 07,2019 12:10:23 PM IST

रेटिंग - 2.5/5

स्टारकास्ट - करण देओल, सहर बाम्बा

दिग्दर्शक - सनी देओल

निर्माता - झी स्टूडियो, सनी साउंड्स

म्यूझिक - तनिष्क बागची, सचेत, परम्परा, राजू सिंह

जॉनर - रोमँटिक

कालावधी - 136 मिनट

बॉलिवूड डेस्क : देओल कुटुंबातील तीसरी पिढी या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. देओल्सप्रमाणे प्रेक्षकही चित्रपटाचा होरो करण देओलची आतुरतेने वाट पाहात होते. देओल्स आपल्या बॉन्डिंगसाठी आणि इमोशन्ससाठी प्रसिद्ध आहेत. कुटुंबाचे प्रमुख धर्मेंद्र अनेक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतात. चित्रपटातही आपल्या पात्रांचे वैशिष्ठ्य डायरेक्टर सनी देओलने भावना आणि निरागसता हेच दाखवले आहे.


अशी आहे कथा...
करण सहगल मनालीमधील प्रसिद्ध ट्रेकिंग कंपनीचा मालक आहे. बर्फाच्या वादळात त्याने आईवडील आधीच गमावले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीची व्हिडिओ ब्लॉगर सहर सेठीची तिथे एक अॅडव्हेंचर ट्रिप प्लॅन होते. सहर पूर्वीपासूनच वीरेन नारंगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सहरची ट्रिप करणच्याच कॅम्प उजी कंपनीमध्ये असते. दोघे विरुद्ध स्वभावाचे आहेत. तरीदेखील आधीच्या छोट्या छोट्या भांडणांनंतर मनाली आणि लाहौल स्पितीच्या जागी वेळ घालवता घालवता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.


नंतर कथेमध्ये येतो लव्ह ट्रँगल आणि फॅमिली ड्रामा. वीरेनला हे सहनच होत नाही की, सहरने त्याला सोडले. तो अनेक कारस्थाने करतो. मग करण आणि सहर एकमेकांचे होतात की, नाही. चित्रपट याबद्दलच आहे. कथा साधी आणि सरळ आहे. जास्त वळणे त्यामध्ये नाहीत. सध्याची पिढी प्रेमासाठी कोणत्या मर्यादा ओलांडते. यावरच कथा टिकून राहते.


भावनिकतेत बांधून ठेवण्यासाठी चित्रपटात गाण्यांवर जास्त लक्ष दिले गेले आहे. सिद्धार्थ गरिमाने गाणी लिहिले आहेत. गाण्याचे संगीत आणि गायन सचेत, परंपरा, अरिजीत सिंह, ऋषि रिच यांनी केले आहे. मनाली, लाहौल स्पिती यांसारख्या सुंदर लोकेशनदेखील चित्रपटात खूप प्रमाणात आहेत. त्यामुळेही चित्रपटाला खूप आधार मिळाला. मात्र लोकेशन आणि गायनामुळे चित्रपटाचा कालावधी 152 मिनिटे झाला आहे.


अनेक वर्षांपूर्वी बड़जात्या यांनी 'विवाह' चित्रपट बनवला होता. त्याची कथाही सरळ होती. पण उत्तम लिखाणामुळे तिथे पात्रांनी इमोशनची सुंदर जादू विखुरली. इथे ते मिसिंग आहे. नायकाची भूमिका करण देओलने भरपूर निरागसतेने साकारली. एवढी जास्त की, जिथे रागाचे भाव येतात तिथे त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड शांतता दिसते. त्याचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत त्याला थोडी सवलत दिली जाऊ शकते. नाहीतर अनेक सीक्वेंसेसमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील इमोशन्स आणि संवाद यांच्यामध्ये खूप मिसमॅच दिसते. चेहरा स्तब्ध राहिला आहे. तो चॉकलेटी नक्कीच दिसला. त्याची लिटमस टेस्ट पुढे येणाऱ्या चित्रपटांमध्ये होईल.


नायिकेच्या भूमिकेमध्ये सहर बाम्बाने नकीच बाजी मारली आहे. पात्राच्या स्वभावातील अवखळपणा तिने खूप उत्तम पद्धतीने सादर केला. व्हिलन वीरेन नांरगसाभ्य भूमिकेत आकाश आहूजाचा अटेम्प ठीक होता. बाकी सचिन खेडे़कर, कामिनी खन्ना पासून व्हिलन मेघना मलिक यांच्या टॅलेंटचा पुरेपूर उपयोग होऊ शकला नाही.

X
COMMENT