आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Instead Of Working In An AC Environment, The Field Offers The Opportunity To Showcase Skills On A Project Basis, Including Employment Opportunities.

एसीच्या वातावरणात काम करण्याऐवजी फिल्ड प्रोजेक्टवर कौशल्य दाखवण्याची संधी देते पायाभूत क्षेत्र, रोजगाराच्या संधीही उपलब्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पायाभूत सुविधांचे क्षेत्र हे कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. भारतात दरवर्षी या क्षेत्रात १५% वाढ होत आहे. या क्षेत्रात पाच वर्षांत १०० लाख कोटी गुंतवण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. ३ कोटी नोकऱ्या ५ वर्षांत यामुळे निर्माण होतील. नोकऱ्या आणि करिअरच्या संधी लक्षात घेऊन दैनिक भास्करने एलअँडटी कॉर्पोरेट एचआरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीराम योगी यांच्यासोबत बातचीत केली आहे. 
 

तुमच्या कंपनीला कोणत्या प्रकारच्या कौशल्यपूर्ण मानव संसाधनांची गरज भासते?
खास डोमेनच्या क्षेत्रात आम्हाला विशेष कौशल्याची गरज असते. यासाठी उदाहरण म्हणून संरचनात्मक अभियंता, मेक्ट्रोनिक्स यांच्यासोबत चर्चा करणारे, टनल बोअरिंग मशीनचे तज्ज्ञ, ऑन व ऑफ इंजिनिअरिंग तज्ज्ञ, विशेष पूल तज्ज्ञ, वेल्डिंग आणि फेब्रिकेशन तज्ज्ञ, सटीक इंजिनिअरिंग तज्ज्ञ, आम्हाला  स्ट्राँग प्रोजेक्ट एज्युकेशन स्किल्स (ईपीसी कौशल्य), कस्टमर इंटरफेसिंग स्किल, सामूहिक उत्साह, भावनिक बुद्धिमत्ता आणि कोणालाही प्रभावित करेल, अशा इत्यादी कौशल्याची गरज असते. 
 

अनुभवी आणि नवोदित कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या कोणत्या प्रकारच्या संधी मिळतात?
आयआयटी, एनआयटीएस आणि उत्कृष्ट सरकारी आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवीधर आणि पदव्युत्तर अभियंत्यांसाठी करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. कनिष्ठ पातळीच्या व्यवस्थापनासाठी २ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. आता अभियांत्रिकीच्या पदवीसह एमबीए करणेही फायद्याचे ठरते. आम्ही अनुभवी व्यावसायिकांची नेमणूक करतो, जे विक्रीच्या कार्यक्रमांचे वितरण करतात आणि व्यवसाय वाढीच्या योजनेनुसार कार्य करतात.
 

मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वत:ला कसे तयार करावे? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
ज्या कंपनीत मुलाखतीसाठी जात आहात त्याबद्दल सखोल अभ्यास केला पाहिजे. कंपनीबद्दल अधिकाधिक माहिती वेबसाइट व इतर माध्यमाद्वारे संग्रहित केली पाहिजे. लांब आणि रटाळवाण्या उत्तरापेक्षा लहान आणि तंतोतंत उत्तरांना प्राधान्य दिले जाते. प्रश्न उत्सुकतेने ऐकणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. कंपनी ज्या व्यवसायामध्ये आहे, तेथील आर्थिक वातावरणाबद्दल माहिती असली पाहिजे.
 

एल अँड टी मधील नोकरीसाठी अर्ज कसा करावा? नवोदित तसेच अनुभवी लोकांनी कशा प्रकारे संपर्क साधावा?
आम्ही कॅम्पस निवडीसाठी विविध महाविद्यालयांना भेट देतो. डिजिटल मीडियावर रिक्त जागांची जाहिरात दिलेली असते. आमच्याकडे असलेल्या  रेफरल योजनेच्या माध्यमातून कोणताही कर्मचारी त्याचा संदर्भ देऊन भरतीबद्दल सांगू शकतो. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेला उमेदवार आमच्या कर्मचाऱ्यांशी बोलून रिक्त जागांविषयी विचारपूस करू शकतात. तथापि, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहावे. एल अँड टी संधी शोधत असलेल्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम ठेवी म्हणून  घेत नाही.
 

कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त दिवस गुंतवून ठेवण्यात काही अडचण आहे का?
बांधकाम क्षेत्रात अशा लोकांची आवश्यकता आहे, जे प्रोजेक्ट साइटवर काम करण्यास इच्छुक आहेत. आमचे बरेच कर्मचारी प्रोजेक्ट साइटवर काम करणाऱ्यांना प्राधान्य देतात.. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्याचे एक उदाहरण आहे. जे लोक केवळ घरातील एसी वातावरणात काम करण्यास उत्सुक असतात ते प्रत्यक्षात साइटवर काम करू शकत नाही.
 

गेल्या काही वर्षांत भरतीची प्रक्रिया बदलली आहे?
भरती प्रक्रिया अधिक स्वयंचलित आणि डिजिटल बनली आहे. भविष्यात निर्णयांमध्ये त्रुटी येण्याची शक्यता कमी करण्यासाठी अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व मशीन लर्निंगचा वापर केला जाईल.
 

येणाऱ्या काही वर्षांत कोणते बदल घडू शकतात?
तंत्रज्ञानामुळे डेटा शास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक आणि तज्ज्ञ अभियंता यांची जास्त मागणी असेल.
५ वर्षांत सरकार पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटी खर्च करणार
२०२२ पर्यंत पायाभूत क्षेत्रात ५ ट्रिलियन रुपयांची आवश्यकता आहे.
 
जागतिक बँक लॉजिस्टिक परफॉरमन्स रिपोर्ट २०१८ च्या नुसार  १६७ देशांमधून पायाभूत सुविधांमध्ये भारताचा ४४ वा क्रमांक आहे.  सर्वांसाठी घरे, स्मार्ट सिटी, महामार्ग बांधकाम, अमृत इत्यादी प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांमध्ये १५% वार्षिक वाढ.  लॉजिस्टिक्स क्षेत्रात १०.५१ % वार्षिक वाढ. २०२० पर्यंत २१५ अब्ज डॉलर्स गुंतवणूक.  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने २०० दशलक्ष डॉलर्सच्या  गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
 २०१९-२० च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पायाभूत सुविधांसाठी ४.५५ लाख कोटी रुपयांची तरतूद 
केली आहे.  
 

या विभागांमध्ये रोजगाराच्या संधी
सिव्हिल इंजिनिअर {स्ट्रक्चर इंजिनिअर आर्किटेक्ट {टाऊन प्लॅनर {सर्व्हेअर {सुपरवायझर {टेक्निशियन इलेक्ट्रिक इंजिनिअर {मायनिंग इंजिनिअर {सेल्स एक्झिक्युटिव्ह {एचआर अ‍ॅडमिन {प्रोजेक्ट मॅनेजर आयटी एक्स्पर्ट {ड्राफ्ट्समन मार्केटिंग मॅनेजर {कन्स्ट्रक्शन साइट मॅनेजर {मशीन मेकॅनिक {मार्केटिंग मॅनेजर डिझाइनर.
 

बातम्या आणखी आहेत...