आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यातच महिलेची छेड काढत मारला धक्का, वाचवायला पती आला तर त्यालाही लाथा घातल्या, CCTV मध्ये घटना कॅप्चर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद - हरियाणाच्या फरिदाबादमध्ये रस्त्यातच एका महिलेची छेड काढून तिला धक्का देत खाली पाडल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेच्या पतीलाही आपटून आपटून लाथांनी मारहाण केली. जखमी दाम्पत्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले आहे. 


ही घटना सेक्टर-23 मध्ये घडली आहे. CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपीने महिलेला धक्का देत खाली पाडल्यानंतर तिच्या पतीवर हल्ला केला. आरोपीही शेजारी राहतो. त्यादरम्यान इतर लोक वाचवायला आले तर आरोपीने त्यांनाही धमकावले. 

 

बातम्या आणखी आहेत...