Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Insurance protection now for one lakh rupees Credit Deposits

पतसंस्थांतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना आता विमा संरक्षण

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2018, 11:27 AM IST

सहकारी बँकांप्रमाणेच आता राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांमधील एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळेल.

  • Insurance protection now for one lakh rupees Credit Deposits

    साेलापूर- सहकारी बँकांप्रमाणेच आता राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांमधील एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळेल. २५ सप्टेंबरपासून 'पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था स्थैर्य निधी योजना'या नावाने ही योजना लागू होईल. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत ठेवींना संरक्षण मिळेल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.


    राज्यात सुमारे १३ हजार सहकारी पतसंस्था कार्यरत अाहेत. त्यांच्याकडे सुमारे ७० हजार कोटींच्या ठेवी आहेत. या संस्था आर्थिक अडचणीत आल्यास ठेवीदारांच्या रकमा मिळण्यात अडचणी येतात. त्या सोडवण्याचा प्रमुख उपाय म्हणून एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा हा निर्णय झाला. ठेवीवर पतसंस्थांनी भरावयाच्या प्रीमियमचा दर लवकरच जाहीर होईल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले. याबाबत पुण्यात झालेल्या बैठकीसाठी सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) आनंद कटके, महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतीक पोखरकर आदी उपस्थित होते.

Trending