आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न झाले रद्द तर मिळणार 10 लाख रुपये, अशी आहे ही खास पॅालिसी,घरात लग्न असेल तर नक्की घ्या ही पॅालिसी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुमचा विवाह नैसर्गिक किंवा मानवी कारणामुळे रद्द झाला तर त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. होय, हे खरे आहे. ही रक्कम तुम्हाला विमा कंपनी देईल. विमा कंपन्या विवाह विमा संरक्षण देत आहेत. आपण हा विमा घेतला असेल आणि आपला विवाह वेळेत ठरला नाही तर विमा कंपनी आपल्याला ठरल्याप्रमाणे रक्कम देईल.

 

विवाह विमामध्ये काय आहे

बँक मार्केट डॉट कॅामनुसार आग, वादळ किंवा भूकंप या नैसर्गिक कारणांमुळे विवाह रद्द होणे, चोरी होणे, पॅालिसी असलेली व्यक्ती मरण पावली किंवा वैयक्तिक दुखापत झाली असेल, रुग्णालयात दाखल असल्यामुळे विवाहाला हजर राहू न शकणे अशा कारणांना विम्याचे संरक्षण मिळेल. या पॉलिसीअंतर्गत अगदी  कार्ड छपाईचा खर्च, अन्न पुरवणारा किंवा वेडिंग हॉल सजावट, हॉटेल आणि प्रवास तिकीट याव्यतिरिक्त, पॉलिसीच्या अंतर्गत भौतिक नुकसान किंवा मालमत्ता गमावणे या परिस्थितीतही विमा मिळेल.

 

या गोष्टी समाविष्ट नाहीत

बंद असलेल्या स्थितीत किंवा सामाजिक तणावमुळे विवाह रद्द झाल्यास विमा मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर एखादा दहशतवादी हल्ला झाला तर त्यावर कोणताही दावा केला जाणार नाही. पॉलिसीमधील व्यक्तीचे अपहरण केले असेल तर ते समाविष्ट केले जाणार नाही. पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेला व्यक्ती लग्नाच्या वेळी वाहतुकिमुळे पोहोचला नाही तर त्याला विमा मिळणार नाही. जर मालमत्तेवर त्या विमाधारकाने किंवा त्याच्या निर्देशनावर हानी केली गेली असली तरीही विमा प्राप्त होणार नाही. पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तीस युद्ध किंवा युद्ध परिस्थितीत मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास अशा प्रकरणात विमा प्राप्त होणार नाही. जर पॉलिसीअंतर्गत तो व्यक्ती स्वत:ला हानी पोहोचवित असेल किंवा आत्महत्या करत असेल तर त्याला पॉलिसी अंतर्गत विमा मिळणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...