आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर इंटेलिजन्स ऑफिसरची आत्महत्या, पार्किंगच्या इमारतीवरुन मारली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या P4 इमारतीवरुन मारली उडी

मुंबई- मुंबईतील विमानतळावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विमानतळावरील इमिग्रेशन विभागात ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर अर्थात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी असलेल्या अभिषेक बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवले.

कनिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिषेक बाबू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील P4 भागातील पार्किंगच्या इमारतीवरुन उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अभिषेक बाबू यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.  

बातम्या आणखी आहेत...