आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Intelligent Car And Bus No Driver Needs, Voice Commands, Hand Gestures Will Be Controlled

इंटेलिजंट कार अन् बसमध्ये नसेल चालकाची गरज, व्हॉइस कमांडने चालतील, हाताच्या इशाऱ्याने नियंत्रित होतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तियांजिन (चीन) - ही छायाचित्रे तियांजिन शहरात सुरू असलेल्या “वर्ल्ड इंटेलिजन्स कॉन्फरन्स’ची आहेत. या प्रदर्शनात इंटेलिजन्स गॅजेट्स आणि स्मार्ट गाड्याही सादर करण्यात आल्या. परिषदेदरम्यान रविवारी सुमारे १.१२ लाख कोटी रुपयांचे करार झाले. परिषदेमध्ये १२६ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उत्तरी चीनच्या टेकटाऊनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ४० देशांतील १,४०० तज्ञ आले आहेत. जगातील अव्वल ५०० पैकी ३८ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यात  हुवावे, अलिबाबा व जनरल इलेक्ट्रिकसारख्या कंपन्यांनी उत्पादने सादर केली आहेत.


म्यूज : इलेक्ट्रिक व स्वयंचलित तंत्रज्ञान असलेली कार
आयकॉनिक मोटर्सने कॉन्सेप्ट कार म्यूज सादर केली. ही इलेक्ट्रिक व सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञान असलेली आहे. हिचे दरवाजे फॉल्कन विंग स्टाइलचे आहे. चार सीटर कारमध्ये हाय परफॉर्मन्स इन्फोटेन्मेंट प्रणाली लावलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...