आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Smart लोकांचे नेतृत्व करण्यासाठी मूर्खच हवा, व्यवस्थापनात महिलांना सर्वाधिक महत्व; जॅक मा यांचा Management फंडा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांनी आपल्या 54 व्या वाढदिवशी निवृत्ती घेतली आहे. त्यांनी आपली जबाबदारी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रुप सीईओ डॅनिएल झेंग यांना सोपविली. 1999 मध्ये त्यांनी 17 मित्रांना सोबत घेऊन अलिबाबा डॉट कॉमची स्थापना केली. काही वर्षांतच ही कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली. चीनच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासात सर्वात मोठे योगदान असलेल्या व्यक्तींमध्ये जॅक मा यांचे नाव सर्वात वर घेतले जाते. केवळ चिनी नागरिकच नव्हे, तर समस्त आशिया खंडात ते लोकांचे रोल मॉडेल बनले. आशिया खंडातील सर्वात धनाढ्य उद्योजकाचा खिताब त्यांनाच जातो. आपल्या निवृत्तीच्या दिवशी त्यांनी कंपनीचा उत्तराधिकारी घोषित करण्यासह आपल्या निवृत्तीनंतरच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा केली. सोबतच, आपल्या अनोख्या मॅनेजमेंटचा मंत्रही दिला. 


शहाण्यांचे नेतृत्व वेड्याकडे का द्यावे? 
जॅक मा यांचा प्रत्येक शब्द आणि वाक्य नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी व्यवस्थापनावर आपल्या अनुभवानुसार मत मांडले आहेत. त्यांच्या मते, "शहाण्या लोकांचे नेतृत्व करण्यासाठी एक वेडाच माणूस हवा. एखाद्या टीममध्ये जर का सगळेच संशोधक आणि तज्ञ असतील तर त्यांचे नेतृत्व एका गरीब किंवा मजूराकडे देणे सर्वोत्तम राहील. त्याची विचार करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी राहील. काही गोष्टींचा वेगळ्या अँगलने विचार करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्यांचे मन जिंकणे सोपे जाते." 


व्यवस्थापनात महिलांना सर्वाधिक महत्व
जॅक मा सांगतात की व्यवस्थापनामध्ये महिला अत्यावश्यक आहेत. त्यांच्या मते, "महिलांची एखाद्या गोष्टीला समजून घेण्याची कुंवत पुरुषांपेक्षा अधिक असते. परंतु, महिलांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे, त्यांची कृतज्ञता. सहनशीलता काय असते याची खरी जाणीव महिलांना असते."


स्पर्धा विसरा, ग्राहकांकडे लक्ष द्या...
जॅक मा पुढे सांगतात, की "आजचा दिवस कठिण आहे. उद्याचा दिवस त्याहून अधिक कठिण राहील. परंतु, परवाचा दिवस निश्चितच सुंदर असेल. तुम्ही स्वतः जोपर्यंत पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्याकडे संधी आहे. सोडून देणे हे सर्वात मोठे अपयश आहे." सोबतच त्यांनी कुठल्याही उद्योगात ग्राहक सर्वात प्रथम प्राधान्य असावे असे म्हटले आहे. व्यवस्थापनात ग्राहकांनाच सर्वात मोठे प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतर तुमचे कर्मचारी तुमचे दुसरे प्राधान्य हवे. गुंतवणूकदार हे तिसरे राहील. कुठल्याही स्पर्धक कंपनीचा किंवा त्यांना स्पर्धा देण्याचा विचार करणे सोडून फक्त ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याकडे लक्ष द्या." असे जॅक मा यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...