आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Interest Rate On EPF Was Reduced By Point 15% To 8 Point 50%; Impact On 6 Crore Employees

ईपीएफवर व्याज दर 0.15% घटवून 8.50% केला गेला; 6 कोटी कर्मचाऱ्यांवर होईल परिणाम

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक

नवी दिल्ली : नवी दिल्ली ईपीएफओने कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) वर व्याजदर 0.15% घटवला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ईपीएफवर 8.50% व्याज मिळेल. 2018-19 साठी हा दर 8.65% होता. ईपीएफवर व्याज घटल्यामुळे 6 कोटी कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. कामगार मंत्री संतोष गंगवारने सांगितले की, "ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला." या निर्णयावर कामगार मंत्रालयाला अर्थ मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागेल. अर्थ मंत्रालयाची इच्छा आहे की, ईपीएफचा व्याज दरदेखील पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम यांसारख्या छोट्या बचत योजनांच्या बरोबरीचे असावे. 

मागील 7 वर्षांमध्ये ईपीएफवर व्याजदर... 

 • वित्त वर्ष : ब्याज
 • 2018-19 : 8.65%
 • 2017-18 : 8.55%
 • 2016-17 : 8.65%
 • 2015-16 : 8.80%
 • 2014-15 : 8.75%
 • 2013-14 : 8.75%
 • 2012-13 : 8.50%
बातम्या आणखी आहेत...