आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PPF, NSC सह विविध योजनांच्या व्याजदरात 0.4 टक्क्यांपर्यंत वाढ, ज्येष्ठांच्या ठेवींवरील व्याजदरही वाढवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पीपीएफ (प्रॉव्हीडंट फंड) आणि एनएससी (नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट) यावरील व्याजदरात 0.4 टक्क्यांनी वाढ केली आहे. आगामी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावरील व्याजदर 7.6 हून आता 8.0 वर पोहोचला आहे. 


>> अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 या तिसऱ्या तिमाहीसाठी नवे दर लागू असणार आहेत. 
>> सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदरही वाढण्यात आला असून आता हा व्याजदर 8.5 टक्के असेल. 
>> तीन वर्षांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात 0.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. 
>> पाच वर्षांसाठीच्या टर्म डिपॉझिटवर 7.8 टक्के आणि सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीमवर 8.7 टक्के व्याज मिळणार आहे. सिनिअर सिटीझन सेव्हींग स्कीमचे व्याज तिमाही तत्वावर दिले जाते. 
>> किसान विकास पत्र (KVP) यावर 7.7 टक्के व्याजदर असेल आणि ते 118 महिन्यांऐवजी 112 महिन्यांत त्याची मुदत पूर्ण होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...