केम छो ट्रम्प / भारत दौऱ्याची उत्सुकता वाढली : ट्रम्प; मोदी म्हणाले, लाखों लोक ट्रम्प यांच्या स्वागतास सज्ज

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे साबरमती गांधी आश्रम व अहमदाबादेतील रस्ते व फुटपाथची दुरुस्ती सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे साबरमती गांधी आश्रम व अहमदाबादेतील रस्ते व फुटपाथची दुरुस्ती सुरू झाली आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा २४ व २५ फेब्रुवारीस नवी दिल्ली व अहमदाबाद दौरा
  • येत्या चार दिवसांत सुरक्षा योजनेचा आरखडा तयार
  • २-३ दिवसांत सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी भारतात दाखल होणार

वृत्तसंस्था

Feb 14,2020 10:00:00 AM IST

अहमदाबाद/वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४-२५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर असून अहमदाबादेत ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. यावर ट्रम्प यांनी आपणास भारत दौऱ्याची जाण्याची खूप उत्सुकता लागली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लाखो लोक ट्रम्प यांच्या स्वागतास हजर राहतील. भारताकडून या खास पाहुण्याचे संस्मरणीय स्वागत होईल. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात अहमदाबादला येण्यापूर्वी सरदार पटेल मोटेरा स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ३०० पोलिसांसह अधिकारी व एनएसजी-एसपीजी तैनात राहतील. येत्या २-३ दिवसांत यूएस सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी अहमदाबाद दौऱ्यावर येत आहेत. येत्या चार दिवसांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सखोल सुरक्षा असणारी योजना आखली जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कवच उभारण्यात येत आहे. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताकडून आपल्या खास पाहुण्यांचे स्वागत करू. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे, हे विशेष उल्लेखनीय.

भारत-अमेरिका मैत्रीस बळकटी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी टि्वटमध्ये म्हटले, डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या २४-२५ फेब्रुवारीच्या भारत भेटीवर आम्ही खूप खुश आहोत. भारताकडून आपल्या सन्माननीय पाहुण्यांचे दीर्घकाळ स्मरणात राहील असे स्वागत होईल. हा दौरा खूप महत्त्वाचा असून यामुळे भारत-अमेरिका मैत्री अधिक बळकट होणार आहे. दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले, दोन्ही देशांत लोकशाही व विविधतेची देवाण-घेवाण करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. आमच्या मैत्रीमुळे येथील नागरिकांनाच नव्हे तर जगाला फायदा होईल.

मोदी माझे खूप चांगले मित्र : ट्रम्प


डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटले, ‘उत्तम संबंध निर्माण व्हावेत म्हणून भारतात जात आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले, उत्तम संबंध प्रस्थापित करण्याची अपेक्षा घेऊन आपण भारत दौऱ्यावर जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र तर आहेतच, पण चांगली व्यक्ती आहेत.’ माझ्या भारत दौऱ्यात विमानतळापासून क्रिकेट स्टेडियमपर्यंत ५०-६० लाख लोक स्वागतास असतील,असे सांगितले.’

व्यावसायिक अडचणी दूर करण्याबाबत होणार चर्चा :

नवी दिल्ली - ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांत व्यवसायवाढीवर चर्चा व करार होण्याची चिन्हे आहेत. एका अधिकाऱ्यांने सांगितले, ट्रम्पच्या दौऱ्यात व्यावसायिक करारावर स्वाक्षऱ्या होतील की नाही हे स्पष्ट नाही. यासंदर्भात वाणिज्य मंत्री पीयूष गोयल व अमेरिकी व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटहायझर यांच्यात दूरध्वनीवर आठवड्यापूर्वी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही देश काही अडचणी सोडवण्यावर आणि उभय देशात व्यापारवृद्धीवर चालना देण्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेने स्टील व अल्यूमिनियम उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या शुल्कावर सूट द्यावी. त्यामुळे काही देशातंर्गत उत्पादनांना जीएसपीतंर्गत निर्यात लाभ मिळायला हवा. कृषी, ऑटोमोबाइल, ऑटो पार्टस व इंजिनिअरिंग क्षेत्रातील उत्पादने अमेरिकेत निर्यात करण्याची परवानगी द्यावी, या मुद्यावर चर्चा झाली.

X
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे साबरमती गांधी आश्रम व अहमदाबादेतील रस्ते व फुटपाथची दुरुस्ती सुरू झाली आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे साबरमती गांधी आश्रम व अहमदाबादेतील रस्ते व फुटपाथची दुरुस्ती सुरू झाली आहे.
COMMENT