आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आज 20 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना त्यांच्या पर्सनल लाइफशी निगडित काही खास बाबी सांगत आहे. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या लव्ह स्टोरीतील काही किस्से आपण जाणून घेणार आहोत. देशाचे सर्वांत तरुण पंतप्रधान राहिलेले राजीव गांधी यांना सोनियांशी पहिल्यांदा बोलण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती.
सोनियांच्या जवळ बसण्यासाठी राजीव यांनी pay केले होते दुप्पट बिल...
- राजीव गांधी यांनी सोनियांना पहिल्या वेळेस केम्ब्रिजच्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये पाहिले होते. त्यांना पहिल्यांदा पाहताच ते मोहित झाले. त्यांनी तुरंत रेस्टॉरंटच्या मालकाला सोनियांच्या शेजारची सीट देण्याची विनंती केली.
- एका मुलाखतीत त्या रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितले होते की, 'राजीव त्या इटालियन मुलीशेजारी बसू इच्छित होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली, पण मी त्यांना म्हणालो की या प्रिव्हलेजसाठी तुम्हाला दुप्पट बिल भरावे लागेल. यावर ते तयार झाले होते.'
पेपर नॅपकिनवर लिहिली कविता
- राजीव यांनी त्याच वेळी पेपर नॅपकीनवर सोनियांसाठी एक कविता लिहिली आणि त्या रेस्टॉरंटमधील सर्वात महागड्या वाइनच्या बॉटलसोबत सोनियांना पाठवली.
- सिमी गिरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत राजीव म्हणाले होते, ''सोनिया यांना पहिल्यांदा पाहताच मला जाणवले होते की ही मुलगी माझ्यासाठीच बनलेली आहे. त्या खूप स्ट्रेटफॉर्वर्ड आणि आऊटस्पोकन होत्या. कधीच काही लपवत नव्हत्या. त्या खूप मनमिळाऊ होत्या.''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.