आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सूर्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या केवळ 2 अब्जावा भाग पृथ्वीवर पाेहाेचताे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे असे मानले जाते की, सूर्य हा आगीचा गाेळा आहे. त्याच्या पृष्ठभागावर सतत आग धुमसत असते, ज्वालामुखीचा उद्रेक हाेत राहताे. परंतु ही बाब चुकीची आहे. सत्य तर असे आहे की, सूर्य हा अतितप्त वायूंपासून बनलेला एक गाेळा आहे. तेथे आण्विक प्रतिक्रियांमुळे अतितीव्र तापमानाची निर्मिती हाेत असते. 


नासा (अमेरिकी अंतराळ केंद्र) च्या मते अंतराळात सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायूंपासून सूर्याची निर्मिती झाली. सूर्यामध्ये ७४ टक्के हायड्राेजन, २४ टक्के हेलियम आणि २ टक्के अन्य तत्त्वे अंतर्भूत आहेत. इतक्या माेठ्या प्रमाणावर हायड्राेजन असल्यामुळेच तेथे सतत ज्वालामुखीसारखे स्फाेट हाेत असतात. दर सेकंदाला सूर्य ७००,०००,००० टन हायड्राेजन ६९५,०००,००० टन हेलियममध्ये परिवर्तित करीत असताे. यामुळे गॅमा किरणांच्या रूपात ऊर्जा प्रसारित हाेत असते. ही गॅमा किरणे प्रकाशात परिवर्तित हाेतात. या प्रक्रियेमध्ये आॅक्सिजनची गरज भासत नाही, सूर्यावर आॅक्सिजन नाही. सूर्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या केवळ २ अब्जावा भाग पृथ्वीवर पाेहाेचताे. 


सूर्याला एक सर्वात माेठी अणुभट्टी म्हटले जाते. सूर्यावरील चिमूटभर घटकांपासून इतकी ऊर्जा निर्माण हाेते की त्यासाठी आम्हाला लाखाे मेट्रिक टन काेळसा जाळावा लागेल. केवळ सूर्यच नव्हे तर अन्य सर्व ताऱ्यांच्या ऊर्जानिर्मितीची प्रक्रिया अशाच पद्धतीने हाेत असते. हायड्राेजन बाॅम्बदेखील अशाच प्रक्रियेच्या माध्यमातून विनाश घडवताे. संशाेधकांच्या मते सूर्य अजून ५ अब्ज वर्षांपर्यंत तळपत राहील.