आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉरर चित्रपटातून फेमस झाली होती ही अॅक्ट्रेस, अंडरवर्ल्डमधून आले फोन तर सोडला देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः रामसे ब्रदर्स यांच्या 1988 साली आलेल्या 'वीराना' चित्रपटातील भूत जॅस्मिनच्या सौंदर्याने अनेक जणांना घायाळ केले होते. असे म्हणतात की, चित्रपटाच्या रिलीजनंतर जास्मिनला अंडरवर्ल्डमधून फोन येत होते ज्यात अनेकजण वाईट उद्देशाने जास्मिनला भेटण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे घाबरलेल्या जास्मिनने देश सोडून जाणे पसंत केले. 

 

कोण होती जास्मिन आणि सध्या कुठे आहे...
- निर्माता-दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांनी 1979 साली आलेला चित्रपट ‘सरकारी मेहमान’मध्ये जास्मिनला प्रेक्षकांसमोर आणले होते. या चित्रपटात विनोद खन्ना आणि अमजद खान यांच्या भूमिका होत्या. 
- कोठारीने यानंतर 1984 साली डायवोर्स हा चित्रपट बनविला आणि त्यातही जास्मिनला घेतले. 
- जास्मिनची खरी ओळख वीराना चित्रपटातील तिच्या भुताच्या रोलमुळे झाली. या चित्रपटात विजयेंद्र घाटगे, शर्मिला टैगोर आणि गिरीश कर्नाडही होते.


आता कुठे आहे जास्मिन, 'वीराना' रिलीज झाल्यावर काय घडले असे..
- असे म्हणतात की, 'वीराना' रिलीज झाल्यानंतर जास्मिनला अंडरवर्ल्डमधून कॉल येत होते. यामुळे नंतर तिने चित्रपटात काम केले नाही. यानंतर जास्मिन अमेरिकाला निघून गेली आणि तिथेच सेटल झाली. 
- असेही म्हणतात की, जास्मिन सध्या जॉर्डन येथे राहते.
- काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्मिन आता जिवंतही नाही.


नावाबद्दलही होता सस्पेंस
- 1979 साली चित्रपटात येण्याअगोदर जास्मिन काय करत होती हेसुद्धा कोणाला माहीत नाही.
- असे म्हणतात की, जास्मिनचे पूर्ण नाव जास्मिन भाटीया होते तर काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव जास्मिन धुन्ना होते.

बातम्या आणखी आहेत...