Home | Gossip | Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

2000 एकर परिसरात आहे ही Filmcity, 2.5 हजारांहून अधिक सिनेमांचे झालंय येथे शूटिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:05 AM IST

फिल्मसिटीत मुव्ही मॅजिक नावाचा एक मोठा हॉल आहे.

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  एन्टरटेन्मेंट डेस्कः हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असून तिचे नाव रामोजी फिल्मसिटी आहे. येथे आजवर अनेक सिनेमांचे शूटिंग पार पडले आहे. 'बाहुबली', चेन्नई एक्सप्रेस आणि विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' यासह अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याठिकाणी झाले आहे. रामोजी फिल्मसिटीचे वाइस प्रेसिटेंड (पब्लिसिटी) एवी राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा समावेश झाला असून 2 हजार एकर परिसरात ही फिल्मसिटी आहे. येथे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक सिनेमांचे शूटिंग पार पडले आहे.

  500 हून अधिक सेट लोकेशन...
  रामोजी फिल्मसिटीत 500 हून अधिक सेट लोकेशन आहेत. वर्षाला सुमारे 200 सिनेमांचे शूटिंग येथे केले जाते. येथे शेकडो गार्डन्स, 50 हून अधिक स्टुडिओ फ्लोअर, ऑथराइज्ड सेट्स, डिजिटल फिल्म बनवण्याची सोय, आउटडोअर लोकेशन, हाय टेक्नॉलॉजी लॅबचा समावेश आहे. येथे कॉश्च्युम डिझाइन लोकेशन, मेकअप, सेट निर्माण, कॅमेरा, सिनेमा बनवण्याचे इक्विपमेंट्स, ऑडिओ प्रॉडक्शन, डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन आणि फिल्म प्रोसेसिंगची सोय उपलब्ध आहे. रामोजी फिल्मसिटीत एकावेळी 20 परदेशी आणि 40 भारतीय सिनेमांचे शूटिंग केले जाऊ शकते.

  रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि प्लेग्राऊडंपासून सर्वकाही उपलब्ध...
  रामोजी फिल्मसिटीत रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मंदिर, महल, पॉश कॉलनी, शहर, गाव, जंगल, समुद्र, नद्या, बाजार, हॉस्पिटल, कोर्ट, चर्च, गुरुद्वारा, मश्जिद, सेंट्रल जेल, खेळाचे मैदान सर्वकाही आहे. येथे सिनेमा किंवा मालिकेच्या स्क्रिप्टच्या मागणीनुसार बदलदेखील केले जाऊ शकतात. चेन्नेई एक्स्प्रेस या सिनेमाचे रेल्वे सीनचे शूटिंग येथे असलेल्या रेल्वे स्टेशनवरच झाले होते.


  बाहुबलीपासून ते रोबोटपर्यंतचे स्पेशल इफेक्ट झाले शूट...
  बाहुबली या सिनेमातील मोठा झरा फिल्मसिटीतच बनवण्यात आला होता. याशिवाय रजनीकांत स्टारर रोबोट या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट रामोजीतच तयार करण्यात आले होते. हृतिक रोशनच्या क्रिशपासून ते शाहरुखच्या दिलवालेचे शूटिंग याच ठिकाणी झाले आहे. सरकार राज या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात बिग बी बराच काळ येथे वास्तव्याला होते.


  रामोजी मुव्ही मॅजिकची एक वेगळीच मजा...
  रामोजी फिल्म सिटीचे मॅनेजर सुमित वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्मसिटीत मुव्ही मॅजिक नावाचा एक मोठा हॉल आहे. येथे लोकांना वेगवेगळ्या छोट्या हॉलमध्ये सिनेमा निर्मितीविषयी माहिती दिली जाते. यामध्ये कॅमेरा, साऊंड, एडिटिंग, मिक्सिंगसोबतच अनेक गोष्टींचा लाइव्ह डेमो दिला जातो. खास गोष्ट म्हणजे हा लाइव्ह डेमो देण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांमधूनच लोकांची निवड केली जाते. उदाहरणार्थ हीरो, हीरोईन, व्हिलनची निवड करुन सिनेमा कसा बनवला जातो, ते येथे दाखवले जाते. येथे एशियातील सर्वात मोठे अॅडव्हेंचर पार्क आणि बर्ड पार्कसुद्धा आहे.


  पुढील स्लाईडमध्ये वाचा, दररोज पाच हजारांहून अधिक लोक येतात फिल्मसिटी बघायला...

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  दररोज 5 हजारांहून अधिक लोक येतात फिल्मसिटी बघायला...
  रामोजी फिल्मसिटी सिनेमाच्या शूटिंगसोबतच एका मोठे टुरिज्म डेस्टिनेशनसुद्धा आहे. येथे दररोज पाच हजारांहून अधिक लोक येत असतात. संपूर्ण फिल्मसिटीचा फेरफटका मारायला दोन दिवस लागतात. येथे केवळ तरुणांसाठीच नव्हे तर कुटुंबासाठी अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीसुद्धा आहेत.

   

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  कृपालू केव्स
  नेचर्स ब्युटीसोबतच शांतता हवी असेल तर कृपालू केव्स बघायलाच हवे. येथील गुफांमध्ये इतिहासासोबतच कलिंग, मगध आणि बोधिसत्वविषयी माहिती देण्यात आली आहे.

   

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  भागवतम् सेट...
  भागवतम् सेट हा पौराणिक मालिका आणि सिनेमांसाठी बनवण्यात आलेला सेट आहे. येथे धार्मिक मालिका, सिनेमे, राजा-महाराजांच्या दरबाराचे शूटिंग होते.

   

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  या सिनेमांचे झाले शूटिंग...
  रामोजी फिल्मसिटीत अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे. यामध्ये बॉबी जासूस, दि डर्टी पिक्चर, बेवफा, हीरो हीरालाल, दावत-ए-इश्क, कॉकटेल, रुद्राक्ष, कृष-2, जय हो, सरकार राज, हैदराबाद ब्ल्यू, रोबोट या सिनेमांचा समावेश आहे. 

   

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  प्रिंसेस स्ट्रीट
  रामोजी फिल्म सिटीतील प्रिंसेस स्ट्रीट उंच आणि मोठ्या इमारतींची लाइन्ड अप कॉलनी आहे. इंटरनॅशनल सिटीस्केपसारखा येथे फिल येतो.  

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  सेंक्चुरी गार्डन

  या गार्डनमध्ये हत्ती,  हिरण, मोर, जिराफ आणि इतर प्राण्यांचे गवतापासून स्कल्पचर  बनवण्यात आले आहे. हे गार्डनसुद्धा अतिशय सुंदर आहे.  

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  जॅपनिज गार्डन

  हे थीमेटिक गार्डन पगोडा स्टाइलमध्ये बनवण्यात आले असून अतिशय सुंदर आहे.  

 • Interesting Facts About World's Largest Integrated Film City Ramoji

  एंजल फाउंटेन

  हे रामोजी फिल्मसिटीतील स्थानिक लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.  

Trending