आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - श्वान माणसाचा सच्चा मित्र म्हणूही ओळखला जातो. ते माणसापेक्षा जास्त प्रामाणिक प्रामाणिक असतात. यांच्यासोबत आपण आपले सुख-दुख देखील शेअर करू शकतो. अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश ज्या ठिकाणी सिंगल सीनिअर सिटिझन्सची समस्य आहे, त्या ठिकाणी श्वानाला माणसापेक्षा अधिक पसंती देतात. एका रिसर्चमध्ये समोर आले आहे, की श्वानांसोबत वेळ घालवल्याने माणसे अधिक हेल्थी राहू शकतात. परंतु, याच मित्रांबद्दल असे अनेक तथ्य आहेत जे बहुसंख्य लोकांना माहिती असतीलच असे नाही. असेच काही Facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
गंध घेऊन ओळखू शकतात माणसाच्या भावना
एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा त्यामध्ये आजारपणाची प्राथमिक लक्षणे असतील तर त्याचा पत्ता घरातील श्वानापेक्षा दुसरे कुणीच लावू शकत नाही. आजारी असताना एक विशिष्ट प्रकारचा घाम सुटतो. त्याचा गंध घेऊन पेट डॉग इशारा देऊ शकतात. एखाद्या घरातील महिला गर्भवती असेल तरी सर्वप्रथम श्वानालाच समजते. एखादी व्यक्ती दुखी असल्यास त्याचा पत्ता देखील या मित्रांना लागतो. गंध ओळखण्याची क्षमता माणसांच्या तुलनेत 10 हजार पटीने अधिक असते. त्यामुळेच श्वानांचे नाक नेहमी समोरून ओले असतात.
पायात असतात घामाच्या ग्रंथी...
माणसाच्या संपूर्ण त्वचेवर घामाच्या ग्रंथी असतात. गरमी होत असल्यास स्किन घाम सोडून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. परंतु, श्वानांच्या शरीरात नव्हे तर फक्त पायातच घामाच्या ग्रंथी असतात. उन्हाळ्यात किंवा गरम वाटत असताना ते अख्खे शरीर झटकून किंवा दम लावून पायातून घाम गाळतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काही तथ्य...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.