आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts: वयाच्या 18 व्या वर्षी फायटर पायलट, CIA चे संचालक ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; असे होते सीनिअर बुश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एचडब्लू बुश (George Herbert Walker Bush) यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी राष्ट्राध्यक्ष मुलगा जॉर्ज डब्लू बुश यांच्यासह 5 मुले-मुली आणि 17 नातवंडे असा परिवार आहे. अमेरिकेचा एकच आदेश असे न्यू वर्ल्ड ऑर्डर जगाला त्यांनीच दिला होता. शीत युद्ध संपविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी त्यांना ओळखले जाते. आज आम्ही आपल्याला जगातील सर्वात बलाढ्य देशाचे सर्वात जास्त जगलेले माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एचडब्लू बुश यांच्यासंदर्भातील 10 महत्वाचे तथ्य सांगणार आहोत. 


सर्वात जास्त जगलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
सीनिअर बुश अमेरिकेचे सर्वात जास्त दिवस जगलेले माजी राष्ट्राध्यक्ष होते. 94 वर्षे जीवंत राहिलेले ते अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध माजी राष्ट्राध्यक्ष होते. यापूर्वी हा विक्रम माजी राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्या नावे होता. ते 93 वर्षे आणि 165 दिवस जगले होते. सीनिअर बुश यांनी त्यांचाही विक्रम मोडला होता.


पुढील स्लाइड्सवर वाचा, उद्योजकही होते आणि कसे बनले 8 तासांचे राष्ट्राध्यक्ष...

बातम्या आणखी आहेत...