आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्म हाऊसमध्ये पडले होते शेतकऱ्यांसहल 16 गायींचे मृतदेह, मिळाला नाही पुरावा, नंतर समोर आले काही विचित्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विस्कॉन्सिन - अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये एक शेतकरी आणि त्याच्या 16 गायींचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळले. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा त्यांना काहीही पुरावा मिळाला नाही. कोणालाही काही कळेना झाले तेव्हा फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर एक्सपर्टना सापडेले कारण अत्यंत विचित्र होते. एक्सपर्ट्स म्हणाले की, शेतकरी आणि त्याच्या 16 गायींचा मृत्यू होणारच होता. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार 29 वर्षांचा मायकल कॉलेजात असल्यापासून त्याला शेती करण्याची आवड होती. त्यासाठी त्याने त्याच्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्यासह काही गायी पाळल्या होत्या. पण काही काळानंतर मायकल बियाडस्ज त्याच्या शेतात मृतावस्थेत आढळला होता. मायकलबरोबरच त्याच्या फार्मवरील 16 गायीही मृतावस्थेत होत्या. 


शेणाच्या खड्ड्याजवळ आढळल्या डेडबॉडी 
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मायकलची डेड बॉडी शेतात शेणखतासाठी तयार केलेल्या खड्ड्याजवळ आढळल्याचे समोर आले. जगभरात शेतकरी अशाप्रकारे शेणखत तयार करत असतात. हे खत पिकांसाठी फायदेशीर ठरत असते. या खड्ड्यात अनेकता शेणखताबरोबर बायोगॅसही तयार होत असतो. 


पोलिसांना समजले की, घटनेच्या दिवशी मायकल सकाळी या खड्ड्याची स्वच्छता करणार होता. त्यातून तज्ज्ञांना एक क्लू मिळाला. या शएणाच्या खड्ड्यात हाइड्रोजन सल्फाइड, मीथेन, कार्बन डायऑक्साइड आणि  अमोनिया असे विषारी वायूही तयार होत असतात. या गॅसमुळेच मायकलचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावर कोणाला विश्वास बसत नव्हता. कारण मायकलने यापूर्वीही अनेकदा या खड्ड्याची स्वच्छता केलेली होती. 


मोकळ्या जागेवर कसा झाला मृत्यू?
हा क्लू मिळाल्यानंतर एक्सपर्ट्सच्या लक्षात आले होते की, मायकल आणि त्याच्या गायींचा मृत्यू विषारी गॅसमुळे झाला होता. पण तरीही तज्ञांना एक बाब खटकत होती. आतापर्यंत अशा गॅसेसमुले मृत्यू होणाऱ्या घटना बंद ठिकाणी घडल्या होत्या. म्हणजे त्याठिकाणी हवा येण्या जाण्याची शक्यता कमी होती. पण मायकलचा मृत्यू मोकळ्या जागेत झाला होता. 


नंतर समोर आले असे काही.. 
तज्ज्ञांनी त्या दिवसाच्या हवामानाबाबत माहिती मिळवली. तेव्हा समोर आले की, त्यादिवशी सकाळी धुके दाटलेले होते. हवेचे प्रमाणही अत्यंत कमी होती. त्यामुळे विषारी वायू एकाठिकाणी जमा झाले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळेच मायकल आणि त्याच्या 16 गायींचा मृत्यू झाला असे समजले गेले. 

बातम्या आणखी आहेत...