आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रा समजून वाचवले प्राण, निघाला लांडगा! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅस्टोनियात मागील आठवड्यात सिंधी धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कुत्रा दिसला. थंडीत बर्फाने गोठलेल्या नदीत पडल्याने तो कुत्रा जीव वाचवण्याची धडपड करत होता. कर्मचारी तत्काळ तेथे पोहोचले. भराभर बर्फ हटवून त्याला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुमारे १०० मीटर बर्फ बाजूला सारल्यानंतर त्याला वाचवता आले. एका टॉवेलमध्ये लपेटून कुत्र्याला कारमध्ये ठेवले. तेथे हीटर लावून त्याला ऊब देण्यात आली. 


पण कुत्र्याला उचलताना कर्मचाऱ्यांना तो जास्त जड आणि मोठा वाटला. तेव्हाच त्यांना थोडी शंका आली. रुग्णालयात नेतानाही कुत्रा कर्मचाऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. एकदा त्याने टॉवेलच्या बाहेर तोंडही काढून पाहिले. प्राण्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेकडे त्याला सुपूर्द केले. तेथील कर्मचाऱ्यांनीही भेदरलेल्या कुत्र्याची स्थिती पाहून त्याला तत्काळ उपचार सुरू केले. पण त्यानंतर कर्मचाऱ्यांना तो कुत्रा नसून लांडगा असल्याचे लक्षात आले. 


थंडीमुळे त्याचा रक्तदाब खूप कमी झाला होता. त्यामुळे तो घाबरला होता. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांनी सध्या त्याला पिंजऱ्यात ठेवले असून पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला जंगलात सोडून दिले जाईल. 


अॅस्टोनियातील पर्यावरण संस्थाही त्याच्या उपचाराची विचारपूस करते. येथील तज्ज्ञांनी सांगितले की, जंगलात सोडून दिल्यावर लांडगा एका दिवसात ७० किमी दूर जातो. या लांडग्याचे प्राण वाचवण्यात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही आभार मानतो. विशेषत: कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांना तो वन्यप्राणी असल्याचे कळले. त्यानंतरही त्यांनी त्यावर योग्य उपचार केले, हे महत्त्वाचे आहे.' या लांडग्याला जंगलात सोडण्यापूर्वी त्याला जीपीएस कॉलर लावली जाईल. जेणेकरून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. 

बातम्या आणखी आहेत...