आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात विचित्र आजाराने ग्रस्त आहे हा तरुण; व्हीलचेअरवर घालवावे लागेल पुर्ण आयुष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेन्सिलवेनिया- अमेरिकेत एका तरुणाला आपल्या दुर्मिळ आजारामुळे आयुष्यभर व्हिलचेअरचा सहारा घ्यावा लागणार आहे. परंतू अशा परिस्थितीतही एका तरुणीने त्याची साथ दिली आहे. शॉन बरको (वय 26) असे या तरुणाचे नाव असून हेना एलवार्ड असे त्याच्या प्रियसीचे नाव आहे. दोघे सोबत असताना लोक त्यांना बहिण भाऊ समजतात. परंतू काही दिवसांपूर्वी एका युट्यूब सिरीजच्या माध्यमातून दोघांनी त्यांच्या रिलेशनबद्दल खुलासा केला होता.  

 

शॉनला आहे स्पायनल मस्कुलर एट्रोफी (एसएमए) नावाचा आजार
>  शॉन 'एसएमए' आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे त्याच्या शरीरात मोटर न्यूरॉनची कमतरता आहे. त्यामुळे त्याच्या अवयवांनी कार्य करणे बंद केले. त्यानंतर त्याला व्हिलचेअरचा सहारा घ्यावा लागला होता. आता तो पुर्णवेळ व्हिलचेअरवर असून हेना त्याचा सांभाळ करते.
>  हेना गेल्या अनेक वर्षांपासून शॉनचा सांभाळ करत आहे. ते जेव्हा बाहेर एकत्र दिसतात तेव्हा लोक नेहमी त्यांच्याकडे पाहून आश्चर्य व्यक्त करतात. अनेक लोक तर हेनाला शॉनची मोठी बहिण समजतात. परंतू आता दोघांनीच जगासमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी युट्यूब सिरीज तयार करुन दोघांच्या रिलेशनचा खुलासा करण्यास सुरूवात केली आहे. 

 

आम्ही ते सर्वकाही करतो जे बाकीचे कपल करतात...
> काही वर्षांआधी हेनाची शॉनसोबत ओळख झाली होती. हेनाने शॉनला एका डॉक्यूमेंट्रीमध्ये पाहिले होते. त्यानंतर हेनाने शॉनशी संपर्क केला. हळुहळु दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यानंतर हेनाला शॉन आवडू लागला. त्यानंतर हेनाने शॉनबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.  
> हेनाने सांगितले, 'आम्ही दोघेजण बाहेर गेल्यानंतर अनेकदा लोक आमच्याकडे तिरस्काराच्या भावनेने पाहतात. तर काही लोक आम्हाला भाऊ बहिण समजतात. परंतू मी नेहमी त्यांना मोठ्या गर्वाने सांगते की, तो माझा ब्वॉयफ्रेंड आहे. लोक आमच्याविषयी विचार करत असतील की, आमच्यामध्ये रोमांस किंवा फिजिकल इंटिमेसी नसेल, पण हे चुकीचे आहे. आम्ही ते सर्वकाही करतो जे इतर कपल करतात. लवकरत माझी डिग्री पुर्ण झाल्यावर मी शॉनच्या बाळाची आई बनणार आहे.'

 

पुढील स्लाइडवर पाहा या कपलचे Photos...
 

बातम्या आणखी आहेत...