आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Interesting : The Real Estate Company Gave A Bonus Of 70 Crores To 198 Employees At The Holiday Party

प्रत्येक कर्मचाऱ्याला एक दोन नव्हे तर 35 लाखांचा बोनस, रिअल इस्टेट कंपनीने 198 कर्मचाऱ्यांसाठी खर्च केले 70 कोटी रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान, आभार मानन्यासाठी ही रक्कम देण्यात आली - कंपनीचे संचालक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील सेंट जॉन प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट कंपनीने आपल्या 198 कर्मचाऱ्यांना 70 कोटी रुपयांचा (10 मिलियन डॉलर) बोनस दिला. कंपनीने हॉलीडे पार्टीत याबाबत घोषणा केली. कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात सरासरी 35 लाख रुपये (50 हजार डॉलर) देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देखील नव्हती. बोनसचा चेक मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सेंट जॉन प्रॉपर्टीजचे संचालक लॉरेंस मेक्रांट्ज यांनी सांगितले की, कंपनीने 14 वर्षांच्या कालावधीत 200 लाख स्वेअरफूटमध्ये कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंटचे काम केले आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. ही कामगिरी साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली. आम्हाला याबद्दल खूप मोठे काहीतरी करायचे होते. यामुळे हा बोनस त्यांना धन्यवादाच्या रुपात देण्यात आला आहे. हॉलीडे पार्टीत एका लिफाफ्यातून या बोनसचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे काम आणि कार्यकाळानुसार निश्चित केला बोनस


मेक्रांट्जच्या मते, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला बोनस त्यांच्या काम आणि कार्यकाळानुसार निश्चित केला आहे. यामध्ये किमान बोनस 100 डॉलर (7 हजार रूपये) होती. ज्या कर्मचारी नुकतेच कंपनीत रुजू झाले किंवा रुजू होणार आहेत अशांना हा बोनस देण्यात आला. तर बोनसच्या रुपातील सर्वाधिक मोठी रक्कम 2 लाख 70 हजार डॉलर (1.91 कोटी रूपये) देण्यात आली आहे. प्रथमच कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा आणि हॉटेलचा खर्च दिला 


बोनसच्या घोषणेनंतर कर्मचारी आनंदात होते. या पार्टीत प्रत्येकजण त्यांच्या कथा सांगत होते. कोणाला क्रेडीट कार्डचे थकीत रक्कम द्यायची होती तर कोणाला कर्ज फेडायचे होते. कंपनीचे संचालकांनी सांगितले की, इतिहासात असे पहिल्यांदा घडत आहे की, एखाद्या कंपनीने दुसऱ्या राज्यांतील 8 शाखांतील कर्मचाऱ्यांच्या विमानप्रवास आणि हॉटेलचा खर्च कंपनीने उचलला आहे.