आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्ष वयापर्यंतच्या लोकांना त्रास देत नाहीत शनिदेव, काय आहे यामागचे कारण?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला क्रूर ग्रह मानण्यात आले आहे. धर्म ग्रंथानुसार, शनिदेव लोकांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ देतात. यामुळे त्यांना न्यायाधीशही म्हणतात. उज्जैनचे पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार ग्रंथांमध्ये शनिदेवाशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत. पुराणानुसार शनिदेवाची गती मंद म्हणजे संथ आहे. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, शनिदेव मंद गतीने का चालतात. याविषयी आपल्या धर्म ग्रंथांमध्ये एक कथा आढळून येते...


- पौराणिक मान्यतेनुसार महादेवाने आपल्या परम भक्त दधिची मुनींच्या घरात पुत्र स्वरुपात जन्म घेतला. ब्रह्मदेवाने त्या मुलाचे नाव पिप्पलाद ठेवले, परंतु जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा दधिची मुनीचा मृत्यू झाला. 


- पिप्पलादने मोठे झाल्यानंतर देवतांना आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण विचारले, तेव्हा शनिदेवाची कुदृष्टीमुळे वडिलांचा मृत्यू झाला असे त्यांना समजले. त्यानंतर क्रोधीत झालेल्या पिप्पलादने शनीदेवावर ब्रह्म दंडाचा प्रहार केला. 


- शनिदेव ब्रह्म दंडाचा प्रहार सहन करू शकत नव्हते, त्यामुळे घाबरलेले शनिदेव पळू लागले. तिन्ही लोकांची प्रदक्षिणा घातल्यानंतरही ब्रह्म दंडाने शनिदेवाचा माग सोडला नाही आणि ब्रह्म दंड त्यांच्या पायावर येउन लागला.


- ब्रह्मदंड पायावर लागल्यामुळे शनिदेव लंगडे झाले. तेव्हा देवतांनी पिप्पलाद मुनीना शनिदेवाला क्षमा करण्यास सांगितले. देवतांनी सांगितले, की शनिदेव न्यायधीश आहेत आणि ते आपल्या कर्तव्याचे पालन करतात. त्यांनतर देवतांच्या आग्रहामुळे पिप्पलाद मुनींनी शनिदेवाला माफ केले. 


- देवतांच्या आग्रहानंतर पिप्पलाद मुनींनी शनिदेवाला या गोष्टीवर माफी दिली, की शनिदेव जन्मापासून 16 वर्षापर्यंतच्या शिवभक्तांना त्रास देणार नाहीत. जर त्यांनी 16 वर्षापर्यंतच्या शिवभक्तांना त्रास दिला तर शनिदेव भस्म होतील. तेव्हापासून पिप्पलाद मुनींचे स्मरण केल्यास शनि पिडा दूर होते असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...