आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महर्षी कश्यप आणि देवमाता आदितीचे पुत्र आहेत सूर्यदेव, नामदेव आणि शनिदेव यांचे पुत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथांमध्ये सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानण्यात आले आहे. सूर्य प्रकाशामुळेच जीवन शक्य आहे. यामुळे पंचदेवांमध्ये यांची पूजा अनिवार्य मानली गेली आहे. दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देणे हिंदू धर्माच्या प्रथेचा भाग आहे. ग्रंथांमध्ये सूर्यदेवाचे कुटुंब आणि त्यांच्याविषयी रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात. पौष मासात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. मकरसंक्रांती आणि पौष मास  (15 जानेवारी 2018 )च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सूर्यदेवाचे कुटुंब आणि त्यांच्याविषयी खास गोष्टी सांगत आहोत...


1. धर्म ग्रंथानुसार सूर्यदेवाची आई आदिती आणि वडील महर्षी कश्यप आहेत. आदिती यांचे पुत्र असल्यामुळे यांना आदित्य असेही म्हणतात.


2. सूर्यदेवाचे लग्न देवशिल्पी विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा सोबत झाला आहे. यजुर्वेदामध्ये सूर्याला देवाचे नेत्र सांगण्यात आले आहे.


3. धर्म ग्रंथांमध्ये सूर्यदेव आणि संज्ञाचे दोन पुत्र आणि एक पुत्री सांगण्यात आले आहे. दोन पुत्र वैवस्वत मनू आणि यमदेव तसेच मुलीचे नाव यमुना आहे.


4. सूर्यदेवाचे तेज सहन न झाल्यामुळे संज्ञाने आपली छाया त्यांच्याजवळ सोडली आणि स्वतः तपश्चर्या करू लागली.


5. सूर्यदेवाची संज्ञाच्या छायेपासून शनिदेव, सावर्णि मनु आणि तपती नामक अपत्यांचा जन्म झाला. सूर्य आणि शनी शत्रू मानले जातात.


6. त्रेतायुगामध्ये कापीराज सुग्रीव आणि द्वापार युगात महारथी कर्ण सूर्यदेवाच्या अंशापासूनच उत्पन्न झाले होते.


7. पक्षिराज गरुडाचे भाऊ अरुण सूर्यदेवाचा रथ चालवतात. या रथामध्ये 7 घोडे असून हे सात दिवसांचे प्रतीक आहेत.


8. सूर्यदेवाची पूजा 12 महिन्यात वेगवेगळ्या नावांनी केली जाते. गायत्री मंत्रामध्येही सूर्य उपासना करण्यात आली आहे.


9. सूर्यदेवाला संज्ञा घोडीच्या रूपात तप करत असल्याचे समजल्यानंतर तेही त्याच्या स्वरूपात त्यांच्याकडे पोहोचले. त्यानंतर अश्विनकुमारांचा जन्म झाला.

बातम्या आणखी आहेत...