Home | International | Other Country | International color marathon in Egypt

आंतरराष्ट्रीय कलर रन मॅरेथॉनमध्ये धावपटूवर टाकले जातात रंग, लोकांना आनंदी आणि सुदृढ करणे हाच उद्देश

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:45 AM IST

इजिप्तमध्ये प्रथमच कलर रन मॅरेथॉन स्पर्धा, ४ हजार स्पर्धक सहभागी

  • International color marathon in Egypt

    कैरो- इजिप्तमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय कलर रन मॅरेथॉन स्पर्धा झाली. इतर स्पर्धांपेक्षाही आगळीवेगळी मॅरेथॉन होती. कारण या स्पर्धेत धावणाऱ्या स्पर्धकांवर चमकते रंग फेकण्यात आले. जगभरातून आलेल्या ४ हजार धावपटूंनी यात सहभाग घेतला होता. जगभरातील लोकांना एकत्र आणणे, त्यांना आनंदी व सुदृढ करणे हाच या स्पर्धेमागचा उद्देश होता. स्पर्धकांनी सांगितले, २०११ मध्ये प्रथमच याचे आयोजन करण्यात आले होते. चार विभागांत स्पर्धा विभागली जाते. त्यानुसार प्रत्येक विभागात धावपटूंवर फेकण्यात येणारे रंग वेगळे असतात. “जगातील सर्वात आनंदी ५ हजार मीटर’ स्पर्धा म्हणून ओळखली जाते.


    “कलर रन’संबंधी १००० कार्यक्रमांचे दरवर्षी अायोजन
    जगातील ४० देशांत या मॅरेथॉनशी संबंधित १००० कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत दरवर्षी जगभरातून आलेल्या ७० लाख स्पर्धकांचा सहभाग असतो. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकांना आधी नोंदणी करावी लागते.

Trending