आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Drug Cartel Busted In Delhi, 1300 Crore Worth Narcotics Seized, 9 Arrested

राजधानीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; 1300 कोटींचे ड्रग्स जप्त, 9 जणांना अटक

3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह विविध देशांत व्हायची तस्करी
  • ऑस्ट्रेलियात याच टोळीच्या सदस्यांकडून यापेक्षा मोठा मुद्देमाल जप्त

नवी दिल्ली - दिल्लीत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून सुमारे 1300 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देशभरातील राज्यांसह परदेशांसोबत सुद्धा लिंक होत्या.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगितल्याप्रमाणे, दिल्लीत शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीकडून तब्बल 20 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. भारतीय बाजारात याची किंमत 100 कोटी रुपये असली तरीही एकूण कारवाईमध्ये 1300 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचा अंदाज आहे. देशात एकाचवेळी जप्त करण्यात आलेला कोकेनचा हा सर्वात मोठा साठा असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच, या टोळीच्या ऑस्ट्रेलियातील सदस्यांकडून आणखी 55 किलो कोकेन आणि 200 किलो मेथेमफिटामाइन (मेथ) जप्त करण्यात आले आहे.

भारतासह जगभरात होते संपर्क
या अमली पदार्थ तस्करांच्या टोळीचे दिल्लीसह एनसीआर, पंजाब, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात सुद्धा संपर्क होते. सोबतच, या टोळीचे सदस्य ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, इंडोनेशिया, श्रीलंका आणि मलेशियासह नायजेरियातील एंजट्सच्या संपर्कात होते. ही टोळी भारतात ड्रग्स आणण्यासह दुसऱ्या देशांना पाठवण्याचेही काम करत होती. प्राथमिक माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी 5 भारतीय नागरिकांसह एक अमेरिकन, एक इंडोनेशियन आणि दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...