आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कन्डोम रॅकेटचा भंडाफोड: आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या 50 कोटी रुपयांचे Condom जप्त, टोळी जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या नावाखाली बनावट कन्डोम पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. चीनच्या हेनान आणि हुबेई येथील इंडस्ट्रियल एरिआवर पोलिस आणि प्रशासनाने धाड टाकून आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद केले. ही टोळी अतिशय गलिच्छ ठिकाणी घाणेरडे आणि बनावट कन्डोम तयार करून त्याला प्रसिद्ध कन्डोम कंपन्यांचे रॅपर लावून विकत होते. प्रशासनाने या दोन्ही कारखान्यांतून कन्डोमचे 5 लाख बॉक्स जप्त केले आहेत. त्या एकूण मुद्देमालाची किंमत 70 लाख अमेरिकन डॉलर अर्थात सुमारे 50 कोटी रुपये आहे. 


हॉटेल, सुपरमार्केट्सला करायचे पुरवठा...
चिनी दैनिक साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, आतापर्यंत या धाडसत्रात एकूण 17 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी काहींनी आपण बनवलेले फेक कन्डोम मोठ-मोठ्या हॉटेल, मॉल्स आणि मेडिकल स्टोअरला पुरवठा करत होतो अशी कबुली दिली. प्रॉडक्शन इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायचे, की या लोकांनी आंतरराष्ट्रीय बाजारात फेक कन्डोम पाठवल्याची शक्यता देखील नकारता येणार नाही. 


असे बनवायचे बनावट कन्डोम
घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, धाड टाकली त्या ठिकाणी गर्भनिरोधकांचे कारखानेच होते. छोट्याशा आणि अतिशय गलिच्छ जागेत लावेलल्या मशीनमध्ये प्रॉडक्शन सुरू होते. बनावट आणि हलक्या दर्जाचे सिलिकॉन या प्रॉडक्ट्समध्ये वापरून त्यावर सर्रास मोठ-मोठ्या ब्रँडचे रॅपर लावले जात होते. कन्डोम तयार केल्यानंतर त्यावर सिलिकॉन ऑईल हे लोक हाताने लावत होते. त्यातही सिलिकॉन तेल घाणेरड्या अशा बादल्यांमध्ये भरून ठेवण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...