आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय सोने तस्करी आता पेस्ट स्वरूपात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : परदेशातून कमी पैशात साेने आणून भारतातील विविध शहरांत त्याची चढ्या दराने विक्री करून नफा कमावण्याकसाठी आंतरराष्ट्रीय रॅकेट माेठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साेन्याची तस्करी पकडली जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून दलालांकडून साेने तस्करी करण्यात येत असून दरवेळी त्यात नवीन बदल घडवण्यात येतात. सध्या सोने तस्करीचे स्वरूप बदलत चालले असून विमानतळावर सोन्याची तस्करी ओळखता येऊ नये या स्वरूपात होऊ लागली आहे. कस्टम विभाग पथकाची नजर चुकवण्यासाठी सोने पेस्ट करून (द्रवस्वरूपात) विविध स्वरूपात तस्करी करण्याचा नवीन मार्ग तस्करांनी शोधला आहे.

पुणे कस्टम विभागाने दाेन काेटी १४ लाख रुपयांच्या साडेसहा किलाे वजनाच्या सोन्याची छुप्या मार्गाने हाेणारी तस्करी मागील सात महिन्यांत पकडली असून नव्या स्वरूपातील पेस्ट साेने यामध्ये प्रामुख्याने मिळू लागले आहे. आजवरच्या कारवायांमध्ये बहुतांश प्रकरणात दुबई, रियाध, शारजा, अबुधाबी, कुवेत आणि श्रीलंका, सिंगापूर, कोरिया, बँकाँक यांसारख्या देशातून येणारे प्रवासी सोने तस्करीत आढळून आले आहेत.

सोन्याची घनता अधिक असल्याने चोरट्या मार्गाने आणलेले सोने मेटल डिटेक्टरमध्ये बीप करते. आपण पकडले जाऊ नये यासाठी पेस्टच्या स्वरूपात सोने पातळ करून सोने तस्करी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. पेस्ट स्वरूपातील साेन्याची घनता कमी व्हावी याकरिता त्यात विशिष्ट द्रव केमिकल टाकले जाते आणि तस्करी केल्यानंतर त्यातील केमिकल द्रव काढून शुद्ध स्वरूपातील साेने वेगळे केले जात आहे.

तस्करांची माहिती कस्टम विभागास द्या

पुणे कस्टम विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी सांगितले की, पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ असून येथे कस्टम विभागाच्या अखत्यारीत पुणे विमानतळ येते. विमानतळावर कस्टम विभागाच्या पथकाचे आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष असते आणि त्यांची व सामानाची चाैकशी बारकाईने केली जाते. साेने तस्करीचे स्वरूप अनेक वेळा बदलताना दिसत असून त्यानुसार नवा ट्रेंड समाेर येत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...