आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव: स्टॅच्यू ऑफ यूनिटी परिसरात प्रथमच झाली पतंगबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवडिया- गुजरातच्या स्टॅच्यूू ऑफ युनिटी स्थापन झाल्यानंतर प्रथमच पुतळ्याच्या परिसरात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात देश-विदेशातील १०५ पतंगबाजांनी सहभाग नोंदवला. पतंगबाजांनी वेगवेगळ्या आकाराचे व डिझाइनचे पतंग उडवले. मंगळवारी आकाशात मोठमोठ्या फुलपाखरांपासून ते घाेडे, बलून, फळे व विविध आकाराचे पतंग उडताना दिसत होते. या वेळी स्पर्धकांनी एकमेकांचे पतंग कापले. या स्पर्धेत जिंकण्यासाठी आपल्या आवडत्या पतंगविक्रेत्याकडून पतंग तयार करवून घेतले जातात. या महोत्सवात २ लाख लाेकांना रोजगार मिळाला आहे. महोत्सवामुळे राज्यातील पतंगांची दुकाने २४ तास सुरू ठेवली आहेत. 

 

इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह ४५ देशांतील पतंगबाज आले 
इंग्लंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, बेलारूस, बेल्जियम, बल्गेरिया, कंबोडिया, कॅनडा, फ्रान्स, इंडोनेशिया, इस्रायल, इटली, मकाऊ, स्वित्झर्लंडसह ४५ देशांतील १५० पतंगबाज सहभाग घेत आहेत. 

 

कोर्टाच्या आदेशावरून गुजरात सरकारची चिनी मांजावर बंदी 
न्यायालयाच्या आदेशावरून गुजरात सरकारने चिनी मांजावर बंदी घातली आहे. व्यापारी अथवा ग्राहक बंदी घातलेल्या साहित्यासह पकडला गेला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...