Home | News | International Magazine The Cut Calling Priyanka Chopra Global Scam Artist

'प्रियांकाने निकला आपल्या जाळ्यात ओढले, लग्न त्याच्या मनाविरुद्ध झाले', आंतरराष्ट्रीय मासिकाने प्रियांकावर केली चिखलफेल, पीसीनेही दिले सडेतोड उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 04:23 PM IST

कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असे द कटने म्हटले आहे.

 • International Magazine The Cut Calling Priyanka Chopra Global Scam Artist


  मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबद्ध झाली आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी उदयपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. आता लग्नानंतर प्रियांकाने तिच्या नावापुढे जोनास हे आडनाव लावले आहे. पण प्रियांकाच्या या आनंदात मिठाच्या खड्याचे काम एका आंतरराष्ट्रीय मासिकाने केले आहे.

  मासिकाने प्रियांका-निकच्या प्रेमावर उपस्थित केला प्रश्न...
  प्रियांका- निकच्या लग्नानंतर मासिकाची लेखिका मारिहा स्मिथने ‘Is Priyanka Chopra and Nick Jonas’s Love for Real?’ या मथळ्याखाली आक्षेपार्ह लेख लिहिला. या लेखात प्रियांकाचा उल्लेख ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा करण्यात आला. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि हॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी निक जोनासशी लग्न केले. निकच्या पैसे आणि प्रसिद्धीचा वापर करून तिला स्वत:चा फायदा करून घ्यायचा होता म्हणूनच तिने स्वत:पेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या निकला आपल्या जाळ्यात अडकवले. हे लग्न निकच्या मनाविरुद्ध झाले असून प्रियांकाने निकला स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडले होते. हा लग्नसोहळा म्हणजे दोघांसाठी पैसे कमावण्याचा कार्यक्रम होता’ यांसारखे अनेक खटकणारे मुद्दे या लेखात मांडण्यात आले होते.

  प्रियांकाने दिले सडेतोड उत्तर..
  'द कट' या मासिकाला प्रियांकाने सडेतोड उत्तर दिले आहे. या गोष्टींना मी महत्त्व देत नाही मी सध्या जगातील सर्वात सुखी व्यक्ती असून माझा आनंद आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे तिने म्हटले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच प्रियांका आणि निकनं दिल्लीतील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्या दोघांच्या नात्याविषयी छापून आलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया विचारली. पण या लेखावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसून या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. मी सध्या खुपच खूश असून कोणत्याही गोष्टी माझा आनंद आता हिरावून घेऊ शकत नाही असे प्रियांकाने म्हटले आहे.

  मासिकाने मागितली माफी...

  या लेखामुळे ‘द कट’ मासिकाविरोधात जगभरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. हा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत द कटने तो लेख आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला. या लेखातील विचार हे मासिकाचे नसून ते मारिहा स्मिथचे आहे . यातून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असे द कटने म्हटले आहे.

Trending