आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांमध्ये 'पंगा' घेण्यासाठी सज्ज झाली होती कंगना, आंतरराष्ट्रीय खेळाडू व कोच गौरी वाडेकरने दिली ट्रेनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो क्रेडिट - मुंबई मिरर - Divya Marathi
फोटो क्रेडिट - मुंबई मिरर

एंटरटेन्मेंट डेस्कः कंगना रनोट आपल्या आगामी 'पंगा' चित्रपटात एका कबड्डी खेळाडुची भूमिका करणार आहे. या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि कोच गौरी वाडेकर यांनी तिला मदत केली आहे. गौरीने सांगितले,मला कबड्डीचे सर्व बारकावे शिकव, असे कंगना म्हणाली होती. त्यानंतर तिला प्रशिक्षण देण्यात आले. काही महिन्यातच ती पारंगत खेळाडू सारखी खेळू लागली, ते पाहून मला आर्श्च वाटले. काही मुली यासाठी सहा महिने लावतात मात्र कंगनाने काहीच महिन्यात ते शिकले, ते कौतुकास्पद होते.

असे झाले प्रशिक्षण : 

  • सप्टेंबर 2018 मध्ये दोघींची पहिल्यादा भेट झाली. पाच महिने कंगनाचे प्रशिक्षण सुरू होते.
  • रोज सकाळी 8 वाजता कंगनाचे प्रशिक्षण सुरू व्हायचे. जे दोन तास चालायचे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग झाले. यावेळी कंगनाने प्रशिक्षणाचाही एक दिवसही मिस केला नाही.
  • कबड्डीसाठी पाय मजबूत असायला हवेत, त्यामुळे कंगनानेर स्क्वेट्स (दंड बैठक) आणि लंजिस (उडी मारणे) सारखा व्यायाम केला.
  • या दरम्यान तिला खेळातील प्रत्येक पैलूची, जसे आक्रमक चढ्या आणि बचाव आदींची माहितीही देण्यात आली.

वजन आणि आहारावरही दिले खास लक्ष :
चित्रपटात कंगनाच्या जीवनातील दोन पैलू दाखवण्यात आले आहेते. एक लग्नानंतर आणि एक मुल झाल्यानंतर, ते पाहूनच कंगनाची ट्रेनिंग ठरवण्यात आली होती. जेथे कंगनाला जाड दिसायचे होते, तेथे वजन वाढण्याकडे लक्ष दिले. यांनतर कबड्डी खेळाडूसारखेच कंगनाने आपल्या आहारातदेखील बदल केला. यावेळी तिने वसा आणि कार्बोहायड्रेट्ससह पदार्थ, फळे, आणि फळांचा रसही घेतला.