• Home
  • News
  • International star Katy Perry comes in India, filmmaker Karan Johar will give welcome party for her

इव्हेन्ट / भारतात पोहोचली इंटरनॅशनल स्टार केटी पेरी, फिल्ममेकर करण जोहर देणार वेलकम पार्टी

भारतासोबत आहे केटीचे एक विशेष नाते

दिव्य मराठी वेब टीम

Nov 13,2019 11:45:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : हॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध सिंगर्सपैकी एक असलेली केटी पेरी मंगळवारी सकाळी भारतात पोहोचली. केटीच्या फॅन्सबरोबरच बॉलिवूडदेखील तिच्या स्वागतासाठी सज्ज एक्सायटेड आहेत. अनेक स्टार्सने केटी भारतात आल्यानंतर तिच्यासाठी वेलकम मॅसेज लिहिले आहेत. ती मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पूर्णपणे कव्हर्ड हुडी सूटमध्ये स्पॉट झाली.

केटी 16 नोव्हेंबरला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी भारतात आलेली आहे. या फेस्टिव्हलसाठी आपल्या तयारीसाठी ती चार दिवस अगोदर भारतात अली आहे. मंगळवारी केटी भारतीय मीडियाला देखील भेटली आणि येथे येण्याबद्दलचा आपला उत्साहदेखील तिने व्यक्त केला.

मुंबईमध्ये कोणता आहे केटीचा प्रोग्राम...

केटीसोबतच डुआ लीपादेखील येथे परफॉर्म करणार आहे. कार्यक्रमामध्ये केटी 'रोर', 'डार्क होर्स' आणि 'कॉन कामा' यांसह आणखी काही सुपरहिट गाणी गाणार आहे. या दोन्ही ग्लोबल पॉपस्टार्सव्यतिरिक्त अमित त्रिवेदी, ऋत्विज यांसारखे भारतीय सिंगर्ससोबतच अनेक लोकल कलाकारदेखील परफॉर्म करणार आहेत. या इव्हेंटसाठी तिकिटांचा दर 3,000 रु. प्रति व्यक्ती एवढा ठेवला गेला आहे.

करणच्या पार्टीमध्ये बॉलिवूड करेल स्वागत...

केटी मुंबईला आल्याने फिल्ममेकर करण जोहर तिच्यासाठी वेलकम पार्टी देणार आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सदेखील सामील होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण तिच्या स्वागतासाठी डिनर आणि कॉकटेल पार्टी ठेवणार आहे. यासाठी सर्वांना आमंत्रितदेखील करणार आहे. पार्टीपार्टीची वेळ अजून ठरलेली नाही, करण जोहरने यापूर्वी हॉलिवूड स्टार विल स्मिथ आणि डायरेक्टर डेरेन एरॉनोस्की यांच्यासाठीही पार्टी दिली आहे.

भारतासोबतचे केटीचे नाते...

केटीचा एक हसबंड रसेल ब्रांडने तिचा भारतातील ताजमहल येथे प्रपोज केले होते आणि दोघांनी भारताच्या राजस्थानमध्येच 2010 साली लग्न केले होते. 2012 मध्ये केटीने चेन्नईमध्ये आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म केले होते. मंगळवारी एका अधिकृत स्टेटमेंटमध्ये केटीने सांगितले, मी एका वर्षानंतर पुन्हा भारतात येऊन खूप खुश आहे आणि मुंबईमध्ये आपल्या परफॉर्मन्ससाठी खूप उत्साहित आहे.

X
COMMENT