आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने मागितली दिल्लीमध्ये 1000 स्वेअर मीटर जागा, भारताने दिला स्पष्ट नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाक सीमेवरील वाढत्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2018 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी पाकिस्तानला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. इंटरनॅशनल ट्रेड फेअर अथॉरिटीचे जीएम फेअर हेमा मैती यांनी सांगितले की, यावेळी पाकिस्तानने व्यापार मेळाव्यात 1000 स्क्वेअर मीटर जागेची मागणी केली होती. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने मागणी फेटाळून लावत प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

 
2016 पासून आहे बंदी
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सीमेवर होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे भारताने 2016 मध्ये पाकसोबत व्यापारी संबंध तोडले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या करामती न थांबल्यामुळे 2017 मध्ये देखील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये पाकिस्तानला प्रवेश दिला नाही.

 

15 देशांना सहभागी होण्याची परवानगी
यावर्षी अफगानिस्ताण, बहरीन, हाँगकाँग. इंडोनेशिया, इराण, किर्गिस्तान. म्यानमार. नेपाळ, दक्षिण कोरिया. स्वीडन, थायलंड. ट्यूनीशिया. तुर्की. संयुक्त अरब अमिरात. युनायटेट किंगडम, व्हियतनाम इत्यादी देशांनी सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 15 देशांच्या कंपन्यांनी सहभाग घेण्यासाठी संकेत दिले आहेत.


जागेच्या अभावामुळे अनेक देशांनी नाकारला प्रवेश
यावर्षीच्या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या बांधकाम आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे अनेक देशांतील कंपन्या आणि आयोजक मेळाव्यामध्ये सहभागी होत नाहीत. बऱ्याच परदेशी कंपन्यांमधील प्रतिनिधींनी राजकीय कारणास्तव आपली ओळख लपवून ठेवत म्हणाले की येथे होत असलेल्या निर्माण कार्यामध्ये मेळाव्यातील प्रशासक आणि कामगारांची ओळख सुनिश्चित न झाल्यामुळे आणि उत्पानाला प्रदर्शित करण्यासाठी जागा अभावामुळे मेळाव्यामध्ये भाग घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...