आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धाराने स्टिअरिंग हाती घेत आयुष्य आणले रुळावर, सासरचा छळ, हुंड्यासाठी मारहाण वाट्यास येऊनही जिद्दीने ती स्वावलंबी बनली...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उषा बोर्डे

औरंगाबाद - सासरच्यांचा छळ किंवा नवऱ्याच्या मारहाणीस कंटाळून अनेक जणी स्वत:चंच आयुष्य संपवतात. रोहिलागड (जि. जालना) येथील चंद्रकला जाधव यांच्यावरही हीच वेळ आली होती.मात्र, त्या डगमगल्या नाहीत. लग्नानंतर संसारच्या रुळावरून घसरलेली गाडी त्यांनी स्वत: हाती स्टिअरिंग घेऊन रुळावर आणली. म्हणूनच एक परित्यक्ता, घरकामगार, स्वच्छता कर्मचारी ते बसचालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा तर आहेच, शिवाय अनेकींसाठी प्रेरणादायी आहे.सोळाव्या वर्षी लग्न झालं आणि सहा महिन्यांतच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. हुंडा आण नाहीतर सवत आणू हीच थेट धमकी. दिराचंही दुसरं लग्न लावून दिल्याचं उदाहरणही समोर. या छळाला कंटाळून त्या सासर सोडून माहेरी आल्या. शिक्षण नव्हतं, पण हाती कला होती आणि जगण्याची धमक. काड्यांपासून त्यांनी केलेल्या बंंगल्याला औरंगाबादच्या हस्तप्रदर्शनात पहिलं पारितोषिक मिळालं आणि चंद्रकलाताईंसाठी जगण्याची कवाडं खुली झाली. त्या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या न्यायाधीश मंजूषा बाराहातेंना त्यांची कहाणी कळली. त्यांनी त्यांना आपल्या घरीच कामाची संधी दिली.
 मंजूषा मॅडमच्या निवृत्तीनंतर न्यायाधीश शरणजित कौर रामगडिया यांच्याकडे त्या घरकाम करू लागल्या. त्यांनीच चंद्रकलाताईंना ड्रायव्हिंग शिकवलं. घरकाम करत त्या कौर यांच्या चालक बनल्या. नंतर एका शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी करू लागल्या. पोटासाठी हाती झाडूपोचा होता, पण नजर स्टिअरिंगवर होती. त्यांनी शाळेतील चालकांना विनवणी करून शाळेची बस चालवण्याचा सराव केला. आज त्या शाळेच्या बसवर चालक आहेत.इतर महिलांनाही मदत

> न्यायाधीश, वकिलांच्या सहवासामुळे कायद्याचे ज्ञान
> इतर महिलांना करतात कायदेशीर मार्गदर्शन
> घाटी रुग्णालयात स्वत:च्या देहदानासाठी भरला अर्ज
> शालेय विद्यार्थिनी आणि तरुणींना देतात प्रोत्साहन