• Home
  • Gossip
  • International Yoga Day : At the age of 75, Mother started Yoga, Akshay Kumar sheared a photo

Bollywood / अंतराष्ट्रीय योग दिन : 75 वर्षे वयात आईने सुरु केला योगा, अक्षय कुमार म्हणाला - 'देर आए दुरुस्त आए'

अक्षयची मुलगी आणि पत्नीदेखील करते योग 

दिव्य मराठी वेब

Jun 21,2019 03:58:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारच्या फिटनेसमध्ये योगाची महत्वाची भूमिका आहे. तो फिट राहण्यासाठी दररोज योग करतो. अंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अक्षयने आपल्या आईच्या योगप्रेमाबद्दल सांगितले आहे, ज्या 75 वर्षांच्या वयात योगा करतात. अक्षयने इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा योगा करतानाचा एक फोटो पोस्ट करून लिहिले आहे, 'काही असे शेअर करत आहे ज्यावर मला खूप गर्व आहे. गुडघ्याच्या सर्जरीनंतर 75 वर्षांच्या वयात आईने योग करायला सुरुवात केली आणि आता हा त्यांच्या दिनक्रमात एक भाग बनला आहे.

अक्षयची मुलगी आणि पत्नीदेखील करते योग...
अक्षयव्यतिरिक्त त्याची पत्नी ट्विंकल खन्नादेखील 5 वर्षांची मुलगी नितारासोबत योगा करतानाच एक फोटो पोस्ट केला आहे.

सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे अक्षय...
अक्षय सध्या रोहित शेट्टीचा चित्रपट 'सूर्यवंशी' चे शूटिंग करत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होईल. याव्यतिरिक्त अक्षय 'लक्ष्मी बॉम्ब'मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये तो एका ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

X
COMMENT