आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील इंटरनेट आधारित व्यवसाय ११.४ लाख काेटी रुपयांवर जाणार

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विद्यमान दशक संपण्याच्या मार्गावर आहे आणि २०२० पासून नवीन दशकाची सुरुवात हाेत आहे. वर्ष २०२० देशातील इंटरनेट आधारित व्यवसायाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. गाेल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत देशातील इंटरनेटवर आधारित व्यवसायाची बाजारपेठ १६,००० काेटी डाॅलर (अंदाजे ११.४ लाख काेटी रु) पर्यंत जाईल. ही सध्याच्या बाजारपेठेच्या तुलनेत तीनपट जास्त आहे. इंटरनेटवर आधारित व्यवसायामध्ये ई-काॅमर्स, ट्रॅव्हल, फूड, क्लासिफाइड, आॅनलाइन कंटेंट इत्यादी येतात.

अहवालानुसार या वेगाच्या वाढीचा फायदा घेण्यासाठी अशा व्यवसायामध्ये तत्काळ गुंतवणूक करणे जरुरी आहे. कारण २०२० मध्ये या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणार आहे. येणाऱ्या काही वर्षांत भारतात बहुतांश माेठे व्यवसाय इंटरनेटवर आधारित असतील. त्यासाठी गुंतवणूकदार या वाढीच्या पहिल्या टप्प्यातच गुंतवणूक करणे पसंत करतील; जेणेकरून त्यांना त्याचा फायदा मिळू शकेल. इंटरनेट आधारित कंपन्या पुढचे २० काेटी ग्राहक जाेडण्यासाठी अधिग्रहण व विलीनीकरणावर जाेर देऊ शकतात. सक्रिय इंटरनेट युजर्सची वाढ मुख्यत: टियर २ - ३ शहरांत व ग्रामीण भागात हाेईल.

देशातील बहुतांश कॅपिटल व्हेंचर फर्म अशा गुंतवणुकीच्या शाेेधात आहेत, जे त्यांना २०२५ पर्यंत चांगल्या स्थितीत नेऊ शकतील. अन्य एका अहवालामध्ये देशात २०२० च्या पहिल्या तिमाहीपर्यंत व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीचा भक्कम कल राहील. हे स्टार्टअप सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणुकीला महत्त्व देऊ शकतात.

साॅफ्ट बँक या दृष्टीने सक्रिय आहे. परंतु आता अन्य अनेक ग्लाेबल इन्व्हेस्टमेंट फर्मही भारताचा विचार करू शकतात. सूत्रांच्या मते प्रायव्हेट इक्विटी फंड वाॅलबर्ग भारतात गुंतवणूक करण्यासाठी १५० काेटी डाॅलरचा निधी उभारत आहे. तर अलिबाबाच्या नेतृत्वाखालील अँट फायनान्शियल भारतासह दक्षिण पूर्व आशियासाठी १०० काेटी डाॅलरचा निधी गाेळा करत आहे. अहवालानुसार भारतात २०२० पर्यंत १०,५०० टेक स्टार्टअप असतील. त्यापैकी कमीत कमी ५० युनिकाॅर्न असण्याचा अंदाज आहे. युनिकाॅर्न म्हणजे असे स्टार्टअप ज्याचे व्हॅल्युएशन १०० काेटी डाॅलरच्या वर जाईल. २०२५ पर्यंत भारतात १०० पेक्षा जास्त युनिकाॅर्न असतील. या स्टार्टअपकडून ११ लाख थेट राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील, असे अहवालात म्हटले आहे.इंटरनेट आधारित व्यवसायाची बाजारपेठ

आर्थिक वर्ष       ई-कॉमर्स        ट्रॅव्हल     फूड     क्लासिफाइड    एकूण
2018-19    3500    1600       220      70       5300 
2024-25   11300    3800     880     200    16100


(रक्कम काेटी डाॅलरमध्ये)