आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Internet Crime Increased By 45% In 2 Years, Now People Are Taking Cyber Insurance

इंटरनेट गुन्हे ५ वर्षांत ४५७% वाढले, आता लोक घेताहेत सायबर विमा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क - इंटरनेटमुळे पैसा आणि प्रायव्हसी दोन्ही धोक्यात आहेत. अलीकडेच आलेल्या दोन बातम्यांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. सिंगापूरच्या आयबी या संस्था ग्रुपने स्पष्ट केले आहे की, १२ लाख भारतीयांचा क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा चोरी झाला आहे. व्हॉट्सअॅपवरही १४०० लोकांची हेरगिरी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत किती वेगाने वाढ होत आहे आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो याची माहिती ‘दिव्य मराठी’ने घेतली. असोचेम-एनईसीच्या अलीकडच्या अभ्यासानुसार, पाच वर्षांत (२०११-२०१६) सायबर गुन्ह्यांत ४५७ टक्के वाढ झाली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दाखल गुन्हे आहेत. सायबर गुन्ह्यांत बँकिंगशी संबंधित घोटाळ्यांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यात दुप्पट वाढ झाली होती, पण गेल्या वर्षी त्यात थोडी घट झाली आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, २०१६-१७ मध्ये सायबर फ्रॉडची १३७२ प्रकरणे समोर आली होती. ते एकूण ४२.३ कोटी रुपयांचे होते. २०१७-१८ मध्ये त्यात वाढ होऊन प्रकरणे २०५९ झाली, ते १०९.६ कोटींचे होते. २०१८-१९ मध्ये त्यात घट झाली आहे. या वर्षी सायबर फ्रॉडची ७१.३ कोटींची १८६६ प्रकरणे समोर आली आहेत, ते गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ९ टक्के कमी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर चोरीमुळे आता या क्षेत्रात विमा घेण्याचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. 
 

आपल्या अॅप्सचा वापर करताना ही सावधगिरी बाळगा
तुम्ही ऑनलाइन जे काही करता कंपन्या त्याचे प्रोफाइल तयार करून सेव्ह करतात. ते हॅक होत असल्याच्या प्रकरणात तुमचा सर्व डेटा हॅकरकडे जातो. सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट अभिषेक धामई यांनी विविध अॅपचा वापर करताना कोणती सावधगिरी बाळगावी याची माहिती दिली.
 

इंटरनेट : थर्ड पार्टी अॅपला आपला डेटा घेण्यास रोखा

डेटा कसा घेतात - मॅपिंग अॅप्लिकेशन्स, कॅब बुकिंग अॅप, फूड अॅप सतत लोकेशन रेकॉर्ड करतात. ब्राउझरवर सर्च आणि शॉपिंग हिस्ट्रीही असते. वाय-फायने कनेक्ट असेल तर सिग्नल स्ट्रेंथ, जवळच्या ब्लूटूथची माहिती, फोन बॅटरी किती चार्ज आहे, अशी माहितीही गुगल वाचते.

कसे रोखावे - डेटा गुगलवरून हटवण्यासाठी myactivity.google.com वर जा. तेथे अॅक्टिव्हिटीचा डेटा हटू शकतो. पुढे असे होऊ नये यासाठीही कमांड देऊ शकता. असेच गुगल मॅप्समध्ये सेटिंग टॅबमध्ये personal content मध्ये जाऊन लोकेशन हिस्ट्रीला ऑफ करू शकता आणि जुनी माहिती डिलीट करू शकता. गुगलमार्फत अनेक थर्ड पार्टी अॅपही डेटा घेण्याचा प्रयत्न करतात, जो आपण कळत-नकळत अधिकृत केलेला असतो. तो डिलीट करण्यासाठी myaccount.google.com मध्ये जा. सिक्युरिटी टॅबवर क्लिक करा आणि third party access वर क्लिक करून या अॅपचा अॅक्सेस limited करा.
 

सोशल मीडिया : फेसबुक आयडीने इतर वेबसाइटवर जाऊ नका

डेटा कसा घेतात - सोशल नेटवर्किंग वेबसाइट सर्वात सहजपणे डेटा गोळा करतात. तुम्ही तुमच्या बेसिक माहितीशिवाय मित्र, आपले विचार, व्यवसाय, नोकरी, कुटुंबांशी संबंधित गोष्टी ऑनलाइन शेअर करता.

कसे रोखावे - सोशल मीडियावर अनावश्यक खासगी माहिती टाकू नका. फेसबुकच्या सिक्युरिटी सेटिंगमध्ये जाऊन आपल्या पोस्ट पाहणाऱ्यांची यादी सीमित करू शकता. अनोळखी व्यक्तीला फ्रेंड करू नका. सामान्य सिक्युरिटी प्रश्नांच्या उत्तरात किंवा एखाद्या पोस्टमध्ये कुठलाही आयडी नंबर, बँक डिटेल्स, अॅड्रेस इ. टाकू नका. एखाद्या थर्ड पार्टी वेबसाइटवर फेसबुक आयडीद्वारे लॉगिन करू नका. लॉगिन सिक्युरिटीसाठी two factor authentication चा वापर करा. असेच थर्ड पार्टी अॅप तुमचा कोणता डेटा पाहू शकते किंवा पाहत आहे ते फेसबुक सेटिंगमध्ये जाऊन पाहा. शेअर करणे आवश्यक वाटत नसेल तर ते हटवा. तुमचे लोकेशन शेअरिंगही बंद करू शकता.
 

अॅड ट्रॅकिंग : वेबसाइट सर्च करताना कुकीजसाठी ओके करू नका

डेटा कसा घेतात : तुम्ही जेव्हा ऑनलाइन काही सर्च करता तेव्हा अनेक इंटरनेट कुकीज (इंटरनेट कुकीज प्रत्येक वेबसाइटच्या पेजवर एक प्रोग्राम सेट असतो.) सर्च सेव्ह करतात. त्यानुसारच तुम्हाला सर्चशी संबंधित जाहिराती दाखवणे सुरू करतात.

कसे रोखावे : आपण एखादी वेबसाइट उघडतो तेव्हा पॉपअपमध्ये कुकीजसाठी “accept” ऑप्शन येते. गरज नसेल तर त्याला ओके करू नका. त्यासोबत network adversing initiative (NIA) च्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही cookies ला आपला डेटा सेव्ह करणे आणि पाहण्यास रोखू शकता. त्यासाठी तुम्ही optout.networkadvertising.org वर व्हिजिट करून third party cookie च्या ट्रॅकिंगपासून सुटका करून घेऊ शकता.