आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मोबाइल इंटरनेट जगात सर्वात स्वस्त, एक जीबी डाटाची किंमत 18.5 रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वर्ष २०१८ मध्ये जगभरात पहिल्यांदाच स्मार्टफोनची विक्री कमी झाली आहे. या उलट भारतीय बाजारात स्मार्टफोन विक्रीमध्ये वाढ झाली आहे. भारतात अत्यंत स्वस्तात मिळत असलेला इंटरनेट डाटा या मागचे प्रमुख कारण आहे. किमतीची तुलना करणारी ब्रिटिश वेबसाइट केबल.को.यूकेच्या अहवालानुसार या वेळी जगभरात सर्वात स्वस्त मोबाइल इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध आहे. भारतात सध्या एक जीबी मोबाइल डाटाची सरासरी किंमत १८.५ रुपये आहे. जगात मोबाइल इंटरनेटची सरासरी किंमत ८.५३ डॉलर (सुमारे ६३० रुपये) आहे. अमेरिकेमध्ये एक जीबी मोबाइल डाटासाठी १२.३७ डॉलर (सुमारे ८७५ रुपये) द्यावे लागतात, तर सर्वात महागडे दर झिम्बाब्वेमध्ये आहेत. तेथे एक जीबी मोबाइल इंटरनेटसाठी ७५.२० डॉलर (सुमारे ५,३१२ रुपये) द्यावे लागतात. ब्रिटिश वेबसाइटने २३० देशांतील ६,३१३ डाटा प्लॅनची तुलना करून हा अहवाल तयार केला आहे. 

जिओ आल्यानंतर कमी दर 
भारतात पहिल्यापासून डाटाचे दर कमी होते, असे नाही. रिलायन्स जिओने पाच सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय बाजारात या व्यवसायाला सुरुवात केली, त्यानंतर इंटरनेटचे दर कमी झाले आहेत. त्या आधी भारतात एक जीबी थ्रीजी डाटासाठी सरासरी २५० रुपये प्रति महिन्याच्या दराने द्यावे लागत होते. टू-जी दर त्या वेळी सुमारे १०० रुपये महिना होते. जिओ आल्यानंतर एअरटेल, आयडिया, व्होडाफोन या कंपन्यांनीही त्यांच्या डाटाच्या दरात कपात केली होती. 

भारतातील ५७ प्लॅनची तुलना 
अहवालात भारतातील ५७ मोबाइल डाटा प्लॅनची तुलना करण्यात आली आहे. त्यांची सरासरी किंमत ०.२६ डॉलर (सुमारे १८.५ रुपये) आहे. सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये एक जीबी डाटाची किंमत केवळ ०.२ डॉलर (१.७५ रुपये) आहे. तर, सर्वात महागड्या प्लॅनमध्ये एक जीबी डाटाची किंमत १.४० डॉलर (९९.९ रुपये) आहे. ही तुलना ११ सप्टेंबर २०१८ च्या दराच्या हिशेबाने केली आहे. 

चीन : १जीबीसाठी ६९८ रु. 
महाखंडाच्या दृष्टीने सर्वात स्वस्त दरात मोबाइल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या अव्वल-२० देशांत अर्धे देश आशियातील आहेे. भारत यामध्ये पहिल्या क्रमांकावर त्यानंतर श्रीलंका, मंगोलिया, म्यानमार व बांगलादेशाचा क्रमांक लागतो. आशियात भारत सोडल्यास मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये दर जास्त आहे. दक्षिण कोरियात १ जीबी डाटाची किंमत १५.१२ डॉलर (१,०६७ रुपये), चीनमध्ये ९.८९ डॉलर (६९८ रुपये) , तर जपानमध्ये ८.३४ डॉलर (५८८ रुपये) आहे. 

ब्रिटनमध्ये ४७० रुपये 
अहवाल तयार करणारी वेबसाइट ज्या देशातील आहे, त्या ब्रिटनमध्ये एक जीबी मोबाइल डाटाची सरासरी किंमत ६.६६ डॉलर (सुमारे ४७० रुपये) आहे. पश्चिम युरोपात सर्वात स्वस्त मोबाइल डाटा फिनलँड देतो. तेथील एक जीबी डाटाची किंमत १.१६ डॉलर (८१.८४ रुपये) आहे. डेन्मार्क, मोनाको आणि इटलीमध्येही प्रति जीबी मोबाइल डाटा २ डॉलर (१४२ रुपये) पेक्षा स्वस्त आहे. तेथे एक जीबी डाटासाठी १.३२ डॉलर (सुमारे ९३.१२ रुपये) द्यावे लागतात. 

सर्वात स्वस्त दराचे अव्वल-१० देश 
क्रम देश किंमत 
1. भारत १८.५ 
2. किर्गिस्तान १९.०८ 
3. कझाकिस्तान ३४.६३ 
4. युक्रेन ३६.०४ 
५. रवांडा ३९.५८ 
६. सुदान ४८.०६ 
७. श्रीलंका ५५.१२ 
८. मंगोलिया ५७.९५ 
९. म्यानमार ६१.४८ 
१०. कोंगो ६२.१९ 
(डाटा किंमत प्रति जीबी रुपयांमध्ये) 

सर्वात महाग दराचे अव्वल-१० देश 
क्रम देश किंमत 
1. झिम्बाब्वे ५,३१२ 
2. इक्व्हेटोरियल गिनी ४,६४८ 
3. सेंट हेलेना ३,९१७ 
4. फाकलँड आयलंड्स ३,३४५ 
५. जिबोती २,६७७ 
६. बर्मुडा २,६६४ 
७. युनान २,०३९ 
८. सामोआ २,१२४ 
९. टोकेलू २,११४ 
१०. नौरू १,९८५ 

बातम्या आणखी आहेत...