आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Internet Set Top Box For TV; Watch 150 Free Channels

या सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क| मार्केटमध्ये फ्री टीव्ही चॅनल्स पाहण्यासाठी नवीन सेट टॉप बॉक्स आला आहे. या बॉक्सची विक्री करणा-यांचा दावा आहे की, यामध्ये तुम्ही 150 चॅनल्स फ्रीमध्ये पाहू शकता. एवढेच नाही तर या चॅनलसाठी कोणत्याही प्रकारची छत्री लावण्याची गरजही नाही. म्हणजेच बॉक्स फक्त टीव्हीशी कनेक्ट करावा लागेल. याचे नाव इंटरनेट सेट टॉप बॉक्स आहे. 


कॉम्पॅक्ट साइज बॉक्स 
हा कॉम्पॅक्ट साइज सेट टॉप बॉक्स आहे. हे तुम्ही पॉकेटमध्येही कॅरी करु शकता. याची विशेषता म्हणजे हे इंटरनेटच्या मदतीने वापरता येऊ शकते. म्हणजेच इंटरनेट कनेक्शननंतर हे हायटेक बॉक्स बनते आणि नंतर सर्वच चॅनल्स दिसू शकतात. तुम्ही हे लॅन केबल किंवा वायफायने कनेक्ट करु शकता. 


याविषयी दिल्ली येथील भारत इलेक्ट्रॉनिकचे ऑनर शब्बीर अलीने सांगितले की, हा सेट टॉप बॉक्स मेड इन इंडिया आहे. हा सर्वात लहान सेट टॉप बॉक्स आहे. हे इंटरनेट आणि विना इंटरनेट यूज करता येऊ शकते. विकास नगर, उत्तम नगर, न्यू दिल्लीच्या मार्केटसोबत ऑनलाइनही खरेदी केले जाऊ शकते. 


- इंटरनेट कनेक्शननंतर यावर 1000 पेक्षा जास्त चॅनल्स येतात.
- जर इंटरनेट कनेक्शन नसतील तर 150 चॅनल्स आयुष्यभर फ्री पाहू शकता. 

 

प्रत्येक TV ला होईल कनेक्ट 
- हा सेट टॉप बॉक्स सर्व प्रकारच्या TV ला कनेक्ट केला जाऊ शकतो.
- बॉक्समध्ये अँटीना IN पोर्ट, RC केबल पोर्ट, HDMI पोर्टचे ऑप्शन दिलेले आहेत.
- याच्या फ्रंटला डोंगल लावण्यासाठी USB पोर्ट आहे. 
- या सेट टॉप बॉक्सची किंमत 1500 रुपयांपासून सुरु होते.