आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिचर्ड्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहली यांच्यात रंगली मुलाखत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील कसाेटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने विंडीजचे माजी  खेळाडू आणि  दिग्गज  फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांची भेट घेतली.   

विराट:  फलंदाजी पाहताना एकच गाेष्ट येते ती,म्हणजे प्रचंड आत्मविश्वास,इतका विश्वास कसा निर्माण हाेताे
सर :  आव्हानाला यशस्वीपणे परतावून लावण्याची क्षमता माझ्यात आहे, याची मला जाण हाेती. हा  विश्वास मला या प्रती असलेल्या आवड आणि मेहनतीतून येत हाेता. 
 

विराट:  वेगवान गाेलंदाजांच्या चेंडूचा तुम्ही हेल्मेट न घालता सामना केला, तेव्हा मनात काेणती गाेष्ट असायची?
सर : (हास्य करत)  मी फार हिमंतवान आहे.  स्वत:च्या क्षमतेवर खेळत आहे, त्यामुळे  धाडसाने सामना करण्याची हिमंत निर्माण हाेत असे. त्यामुळे मात देणे हेच न मनावर बिंबवलेले.
 

विराट:  सुरुवातीलाच चेंडू  लागल्यास त्यानंतर मनात निर्माण हाेणारी भिती दुर हाेते? 
सर : बराेबर. देवाची  इच्छा असेल तर, दुखापत व्हावी. मात्र,त्यातून पुर्णपणे सावरण्याचेही बळ देवानेच द्यावे. मैदानावर कुठेही खेळताना हाेणाऱ्या दुखापतीचा धाेका तुम्ही कधीही टाळू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...