आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात प्लॅन बी विषयी मी कधी विचार केला नाही : दलीप ताहिल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताहिल लवकरच रजनीकांत यांच्या ‘दरबार’ मध्ये त्यांच्या बॉसच्या रूपात दिसणार आहेत
  • ताहिल यांना ‘दरबार’ चित्रपटाची ऑफर कशी मिळाली जाणून घ्या

बॉलिवूड डेस्क - दलीप ताहिल चार दशकांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी श्याम बेनेगल, रमेश सिप्पी, महेश भट्‌टसह अनेक उत्कृष्ट दिग्दर्शकासोबत काम केले आहे. आता ते लवकरच रजनीकांत यांच्या ‘दरबार’ मध्ये त्यांच्या बॉसच्या रूपात दिसणार आहेत. या खास मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरसह जीवनातील बॅकअप प्लॅनवर मनमोकळी चर्चा केली...,‘दरबार’ चित्रपटाची ऑफर कशी मिळाली ?

चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादास यांच्या ऑफिसमधून मला फोन आला. त्यांना एक सशक्त अभिनेता हवा होता, जो या चित्रपटात रजनी सरांचा बॉस बनू शकेल. मला बोलावल्यावर मी रजनी सरांना नाही म्हणू शकलो नाही. त्यांच्याबरोबर काम करणे मोठी गोष्ट आहे. यात पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारताेय. माझे सीन रजनी सरांसोबत आहेत. ते फार महत्वाचे आहेत. अशाप्रकारे दरबारमध्ये माझी एंट्री झाली.

आतापर्यंत साकारली नसलेली एखादी भूमिका साकारायची इच्छा आहे का ? 

मला एका संगीतमय भूमिका करायची इच्छा आहे. मला एक चित्रपट करायचाय, ज्यात मला स्वत: ची गाणी गायची आहेत. अशी भूमिका कधी आणि केव्हा मिळेल, माहित नाही. मात्र अशी भूमिका करण्याची इच्छा आहे. माझी सुरुवात एका संगीतमय नाट्याने झाली होती. परंतु अजून चित्रपट किंवा दूरदर्शनमध्ये ते करू शकलो नाही. २०२० मध्ये कोणीतरी माझे ऐकेल आणि मला संधी मिळेल, असे वाटते.

साडेचार दशकाच्या करिअरचे गुपित काय आहे ?

चार दशकांचा जेव्हा विचार करतो तेव्हा स्वत:ला भाग्यवान समजतो. चांगल्या लाेकांसोबत कामाची सुरुवात केली. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. एलेक पद्मश्री यांच्यासोबत करिअर सुरू केले होते. त्यांना गुरु मानतो. ते थिएटरचे प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी जे शिकवले ते आजही लक्षात आहे. सेटवर वेळेवर जाणे आणि दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकणे, हे मी पाळतो. कारण तो आपल्यावर पैसा लावत असतो. त्यामुळे त्याचे ऐकतो आणि प्रमाणिकपणे काम करतो.

आज प्रत्येक कलाकाराचा बॅकअप प्लॅन आहे. तुमचा बॅकअप प्लॅन काय आहे ?

माझ्याकडे काहीच बॅकअप प्लॅन नाही. माझा ए प्लॅनच अद्याप सुरू आहे, मी प्लॅन बीबद्दल विचार केला नाही. आता मी ६६ वर्षांचा झालो आहे, आता बी योजनेबद्दल काय विचार करू? सर्व दरवाजे बंद झाले तर आश्रम, गुरुद्वारामध्ये कुठेही जाईल, तेथे जाऊन भजन वगैरे करेल. पण कधीकधी भीती वाटते, कारण प्लॅन बी ठेवायला हवा होता. देवाच्या कृपेने सध्या काम मिळत आहे. प्लॅन-बीविषयी मला समजले नाही, मात्र २०२०मध्ये काही तरी नक्कीच सुरू करेन.इतक्या लोकप्रिय कलाकाराचा बॉस साकारायला भीती वाटत होती का ?

रजनीकांत देवासारखे आहेत. ते खूप मोठे  स्टार आहेत. मात्र त्यांच्यासोबत काम करताना ते कधीच याची जाणीव होऊ देत नाहीत. त्याची जाणीव नंतर होते की, आपण रंजनीकांतसोबत काम केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. सेटवर ते सामान्य माणसांसारखे राहतात. त्यांची सिक्युरिटी सर्व काही सेटच्या बाहेर असते. ते जमिनीला जोडलेला माणूस आहे. शूटिंग संपताच आपल्या सामान्य गेटअपमध्ये कुर्ता-पायजामा घालून सर्वांसोबत बसतात.