आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Interview: Katrina Spoke About Ranveer's Breakup, Said, 'Mom Said, You Are Not Alone, Every Girl Has To Face Such A Situation.'

इंटरव्यू : रणबीरसोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलली कतरिना, म्हणाली - 'आई म्हणाली होती, तू एकटी नाहीस, प्रत्येक मुलीला अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणबीर कपूर सध्या आलिया भट्टला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. त्यापूर्वी तो कतरिना कैफसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होता पण तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आहे. तसे तर ब्रेकअप होऊन बरेच दिवस झाले आहेत पण कतरिनाने आता याबाबत मुक्तपणे काही सांगितले आहे. 

 

कतरिना म्हणाली, 'नाते संपवल्याची जबाबदारी माझी...' 
एका मीडिया इंटरव्यूमध्ये कतरिना म्हणाली होती, 'पुढे जाण्यासाठी ब्रेक गरजेचा आहे. मी हे नाते संपवण्याची जबादारी घेते. माझ्या समोर अशा समस्या येत होत्या ज्यासाठी मी तयार नव्हते. माझी आई म्हणाली अनेक मुली या समस्यांचा सामना करतात. तुला वाटते की, तू एकटी आहेस पण तू एकटी नाही. प्रत्येक मुलगी या प्रसंगातून जाते. तिच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. 

 

रिलेशनशिपमध्ये असणे एक सुंदर अनुभव असतो... 
कतरिना पुढे म्हणाली, 'मी अधीपासूनच खूप इमोशनल होते आणि हे कुना दुसऱ्यासाठी बदलू शकत नव्हते. पण मला जाणवले की, एक महिला असल्याकारणाने आपल्याला आपल्या अस्तित्वाची रक्षा स्वतःच करावी लागते. तुमचे महत्व तुम्हालाच राखावे लागते, तुम्ही या जगात एकटेच आला आहात आणि तुम्हाला एकट्यालाच जावे लागते. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. मी हे म्हणत नाही की, प्रेम करणे चांगले नसते, रिलेशनशिपमध्ये असणे म्हणजे एक सुंदर अनुभव आहे... 

 

कुणालाच मनात कडवटपणा नाही... 
कतरिना पुढे कुणाचेही नाव न घेता म्हणाली कुणीही असो, जुन्या गोष्टींमुळे माझ्या मनात काही कडवटपणा नाही. मला नाही वाटत कुणी माझे मन दुखावले आहे. सगळे तुमच्यासाठी चांगलाच विचार करतात पण आपल्यासाठी बेस्ट करण्याच्या नादात आपण स्वतःचे नुकसान करून घेतो. मला मित्रापेक्षा जास्त शत्रूवर विश्वास आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर कतरिना लवकरच सलमान खान स्टारर फिल्म 'भारत'मध्ये दिसणार आहे जी 5 जून 2019 ला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...