आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्यापेक्षा जसे माझे चित्रपट वेगळे हाेते; तसे माझे राजकारणही असेल : कमल हसन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता, चित्रपट निर्माता व अाता राजकीय नेता म्हणून कमल हसन हे अापली नवीन इनिंग सुरू करत अाहेत. भारतीय चित्रपटांना जगभरात साॅफ्ट पाॅवरच्या दृष्टिकाेनातून सादर करण्याची त्यांची इच्छा अाहे. एका कामानिमित्त मुंबईत अालेल्या हसन यांच्याशी प्रवासादरम्यान ‘भास्कर’च्या शुभा शेट्टी-साहा व अमित कर्ण यांनी चर्चा केली.


तुम्ही टि्वटरवर स्वत:ला निओ पाॅलिटिकल्चरिस्ट असल्याचे सांगितले. हे काय अाहे?  
> या विचारांचे लाेक विकासाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतात. लाेक जयप्रकाश नारायण यांच्यावर अाराेप करतात की, त्यांनी राजकारणाचा स्तर घसरवला तसेच लुटारूंना नेते बनवून टाकले. हे पूर्णपणे चुकीचे हाेते. अाता लाेकांना समृद्ध बनवण्याएेवजी शाैचालये बांधली जात अाहेत व याला सरकार स्वत:ची माेठी कामगिरी म्हणून सादर करत अाहे. माझे राजकारण वेगळे अाहे. वास्तविक विकासाची सुरुवात हॅपीनेस काेशंटपासून झाली पाहिजे. नागरिक किती अानंदी व संपन्न अाहेत. अाज असलेली राजकीय स्थिती खूपच विचित्र अाहे. त्यामुळे मी या स्थितीत ‘हे राम’ चित्रपट बनवू शकत नव्हताे.


रजनीकांत यांनीही राजकारणात पाऊल ठेवले अाहे. यावर काय म्हणाल?  
> मी त्यांचा अपमान करत नाहीये; परंतु अाम्हा दाेघांना एकाच तराजूत ताेलू नका. माझे चित्रपट वेगळे अाहेत. परिणामी, माझे राजकारणही त्यांच्यापेक्षा वेगळे अाहे. लाेकांना शब्दांच्या जंजाळात अडकवून ठेवणारे नेते अाम्ही अाणू इच्छित नाहीत. अाम्ही अद्याप राजकीय यंत्रणेत रुजलेलाे नाहीत. तरीही विराेधकांच्या भूमिकेत अाहाेत. सत्ताधाऱ्यांनी जी अाश्वासने दिली हाेती, ती पूर्ण न झाल्याने अाम्ही अातापासूनच प्रश्न विचारू लागलाे अाहाेत. मंजूर झालेले लाेकायुक्त विधेयक मूळ विधेयकाच्या तुलनेत खूपच कमकुवत अाहे. याबाबत तक्रार करणाऱ्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठाेठावण्यात अाली तसेच दंडही अाकारला. अाम्ही अशा व्यक्तींच्या अधिकारांसाठी लढत अाहाेत. असे मुद्दे काेणीही उचलत नाही. रजनीकांतजीसुद्धा नाहीत. त्यामुळे कृपया करून माझी त्यांच्याशी तुलना करू नका.


तुमच्या पक्षाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध हाेईल?  
> अाम्ही निवडणूक अायाेगाकडे अामचा पक्ष ‘मक्काल निधि मयम’ची नाेंद केली असून, पक्षाच्या जाहीरनाम्यावरही काम सुरू अाहे. अामचा जाहीरनामा अागामी ८० दिवसांत प्रसिद्ध करू. अामच्याकडे हार्वर्डचे तज्ज्ञ असून ते अाम्हाला सामाजिक, अार्थिक व इतर मुद्द्यांवर कसे काम करावे, हे सांगत अाहेत.


महात्मा गांधींना राजकुमार हिराणींनी त्यांच्या चित्रपटांत वेगळ्या पद्धतीने सादर केले, तुम्ही वेगळ्या पद्धतीने. तुम्ही या विचारधारेकडे कसे पाहता?  
> मी कधीही त्यांच्या मूळ नावाआधी ‘महात्मा’ लावून त्यांना संबाेधले नाही. असे केल्यास ते आपल्यापासून दूर जातात असे वाटते. त्यामुळे ते नेहमी आपल्याजवळ राहावेत यासाठी मी त्यांना कधीही महात्मा संबाेधले नाही. मी त्यांच्याबद्दल एक पत्र लिहिले तेव्हाही त्यावर ‘डियर माेहन’ असा उल्लेख केला हाेता, ‘डियर महात्मा’ नव्हे. अापण पंडित नेहरूंना चाचा म्हणताे, गांधीजींना बापू. माझ्या मुली मला बापू म्हणून बाेलावतात. माझे वडील काँग्रेसमध्ये हाेते. मी त्यांचे समर्थन करावे यासाठी त्यांनी कधीही माझ्यावर दबाव टाकला नाही. त्यामुळेच मी ‘हे राम’ बनवला हाेता. ताे बनवण्यापूर्वी मी गांधीजींचे विचार समजून घेण्यासाठी १५ वर्षे प्रयत्न केले. त्यांच्याबाबत विचारशक्ती विकसित झाल्यानंतर मी हा चित्रपट तयार केला. त्यावर कुणीही मला काही बाेलले नाही. केवळ तुषार गांधी अाले हाेते. गांधीजींविरुद्ध चित्रपट बनवू नका व तुम्ही त्यात नथुराम गाेडसे बनू नका, एवढेच त्यांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना हे ‘एक्स्पीरिमेंट्स विथ ट्रुथ’ अाहे, ‘एक्स्पीरिमेंट्स इन ट्रुथ्स’ नव्हे, असे या चित्रपटाबाबत समजावले. तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात अाले. मग त्यांना चित्रपटात तुषार गांधींची भूमिका साकारण्यास सांगितले.


तुमचा अलीकडचा ‘विश्वरूपम-२’ व त्या धाटणीच्या इतर चित्रपटांत जगाला अारसा दाखवला जाताे. विशेषत: अमेरिकेच्या धाेरणांना. असे असूनही त्यांच्या विस्तारवादी व संरक्षणवादी विचारात कुठलाही बदल हाेत नाही. यावर तुमचे मत काय?  
> काहीही नाही. जाेपर्यंत ट्रम्पसारखे राजकीय नेते राहतील, ताेपर्यंत बुश यांच्या कार्यकाळापेक्षाही वाईट स्थिती राहील. ते असे दूरदर्शी अाहेत, जे शक्यतांच्या दरवाजांवर लाथा मारून दरवाजे उघडण्याचे ढाेंग व दिखाऊ प्रयत्न करत राहतील. दरवाजे तर उघडणार नाहीत. त्यामुळे ते सांगत फिरतील की, अमुक-अमुक समस्येचे उत्तर बाॅम्बवर्षाव करणे हेच अाहे.


अाखाती देशांत अमेरिकी धाेरणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर काही उपाय दिसतात काय?  
> काेणताही उपाय दृष्टीस पडत नाही. अमेरिका केवळ दुसऱ्या महायुद्धात एक हीराे म्हणून जगासमाेर अाली हाेती. त्यानंतर काेरिया किंवा व्हिएतनाम, जिथे कुठे त्यांनी सैन्य कारवाया केल्या त्या सर्व चुकीच्या ठरल्या. यातून अमेरिका व्हिलन म्हणूनच समाेर अाली. व्हिएतनामवरील हल्ल्यांना अाता ते अापली चूक मानत अाहेत. ट्रम्प यांच्या कार्यकाळात जी धाेरणे बनली, त्याबद्दल त्यांना अाजपासून २० वर्षांनंतर पश्चात्ताप करावा लागेल. भारतातही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण केले जात असून, लाेकशाहीच्या इतर स्तंभांना सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत अाहे. ते अापली मनमानी करत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...