आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान-2चे विक्रम लँडर शोधणाऱ्या शणमुगने सांगितले - 16 दिवस दररोज 6 तास एक-एक पिक्सल पाहिले, तेव्हा अवशेष दिसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीहून अनिरुद्ध शर्मा - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाला चांद्रयान-2च्या विक्रम लँडरचे अवशेष मिळाले आहेत. नासाने मंगळवारी सकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून अंदाचे 600 किलोमीटर दूर असलेल्या पृष्ठभागाचे फोटो जारी केले आहे. 7 सप्टेंबर रोजी या ठिकाणी विक्रम धडकले होते आणि त्याचे तुकडे एक किलोमीटर परिसरात पसरले होते. नासाने या शोधाचे श्रेय चेन्नईच्या 33 वर्षीय मेकॅनिकल इंजीनिअर शणमुग सुब्रमण्यम (शान) यास दिले आहे. शणमुगकडून त्याच्या या शोधाविषयी जाणून घेतले. 

शणमुगने पहाटे 4 वाजता नासाकडून आलेला मेल पाहिला

मंगळवारी शणमुगच्या दिवसाची सुरुवात नासाकडून मिळालेल्या एका मेलने झाले. त्याने पहाटे चार वाजता हा मेल तपासला. नासाच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर मिशन (एलआरओ)चे डिप्टी प्रोजक्ट वैज्ञानिक जॉन कॅलने शानला ई-मेल पाठवला होता. यामध्ये नासाने शानला विक्रम लँडरचे ढिगारा शोधण्याची सूचना दिल्याबद्दल आभार मानत लिहिले की, 'एलआरओ टीमने आपल्या शोधाची पुष्टी केली आहे. तुम्ही दिलेल्या माहितीनंतर आमच्या टीमने त्या ठिकाणी सविस्तर तपास केला असता लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर धडकल्याचे ठिकाण आणि त्याच्या भोवती विखुरलेल्या तुकडे शोधले आहेत. नासा तुम्हाला याचे श्रेय देत आहे. या शोधासाठी तुम्हाला बराच वेळ आणि प्रयत्न खर्च करावा लागला असेल. याविषयी आपल्याशी संपर्क साधण्यात उशीर झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. परंतु सर्व काही सुनिश्चित करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक होता. आता प्रसार माध्यमे तुमच्याकडे या शोधाविषयी विचारपूस करतील.' 


हा ई-मेल वाचल्यानंतर शणमुगचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. स्वतःला रमणियन (रमणचा प्रशंसक) म्हणणाऱ्या शणमुग सुब्रमण्यमने नासाकडून आलेले पत्र तत्काळ ट्विटरवर ट्विट केले आणि ट्विटर हॅण्डलवर आपल्या स्टेटसमध्ये 'मी विक्रम लँडर शोधले' असे लिहीले. 


शणमुगने सांगितले की, "विक्रम लँडर ठरल्याप्रमाणे चंद्रावर उतरले असते आणि काही फोटो पाठवले असते तर याबाबत एवढी रुची वाढली नसती. मात्र विक्रम लँडरच्या क्रॅश लँडिंगने याबाबत रुची वाढवली. नासाने 17 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणाचा फोटो जारी केला होता. तो 1.5 जीबीचा होता. मी तो डाउनलोड केला. सुरुवातीला मी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा मला वारंवार वाटले की लँडर येथे आहे, तेथे आहे, परंतु ते योग्य नव्हते, कारण मी ज्याला लँडर समजत होतो तो एखादा दगड असू शकले असते. यानंतर मी इस्रोच्या लाइव्ह टेलीमेट्री डेटाच्या मते, विक्रम लँडरची शेवटी गती आणि स्थितीच्या अनुषंगाने दोन वर्ग किलोमीटर संभाव्य क्षेत्राचे पिक्सल बाय पिक्सल स्कँनिंग केली."

16 दिवस फोटोंना चाळले नंतर चमकता बिंदू दिसला : शणमुग


शणमुगने सांगितले की, " मी 17 सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत दररोज रात्री 4 ते 6 तास हे फोटो पाहिले. मला प्रस्तावित लँडिंगच्या ठिकाणापासून 750 मीटर दूर एक पांढरा बिंदु दिसला. हा बिंदू लँडिंगच्या निश्चित तारखेपूर्वीच्या फोटोत तेथे नव्हता. त्या बिंदू चकाकी जास्त होती. यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मला अंदाज आला की, तो विक्रमचा तुकडा आहे. यानंतर कदाचित या ठिकाणी विक्रम चंद्राच्या मातीमध्ये फसल्याचे मी ट्विट केले. नासाच्या काही शास्त्रज्ञांना सुद्धा हीच माहिती चंद्राच्या पृष्ठभागाच्या निर्देशांकांसह विस्तृतरित्या ई-मेलवर पाठविली."

शणमुग सांगतो की, "मला विश्वास होता की, मी जे शोधले आहे त्याची एक ना एक दिवस नक्की पुष्टी होईल. 11 नोव्हेंबर रोजी एलआरओकडून या भागाचे नवीन फोटो आल्यानंतर नासाने याच ठिकाणचे डिसेंबर 2017 मध्ये घेतलेले फोटोंसोबत खोलवर पडताळणी केल्यानंतर माझा शोध समोर आले. त्यांनी मला याचे श्रेय दिल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी विक्रमच्या ढिगाऱ्याचा फक्त एक तुकडा ओळखू शकलो, मात्र नासाने तीन तुकडे शोधले. तसेच क्रॅश लँडिंगच्या आधी आणि नंतरचे फोटो जारी करत चंद्राच्या पृष्ठभागावरील दाखवला."

कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि अ‍ॅप बनविण्यात रस असणार्‍या शणमुगला अंतराळाविषयी उत्सुकता आहे. तो म्हणतो की, नासा आणि चांद्रयानची माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. जेणेकरून चंद्राचा सविस्तर नकाशा तयार केला जाऊ शकतो. तो म्हणाला की, "आपण जर मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहत असू तर चंद्रावर एक बेस स्टेशन असायला हवे. यासाठी, सध्या चंद्रावर बरेच संशोधन करण्याची आवश्यकता आहे. माझे स्वप्न आहे की, एक असे अंतराळ यान असावे जे विमानासारखे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल." लँडिंग साइटच्या फोटोंसह नासाने शानला या शोधाचे श्रेय दिले


तामिळनाडूचे कंप्युटर प्रोग्रावर आणि मेकॅनिकल इंजिनिअर शणमुग सुब्रह्मण्यम यांनी चंद्रावर विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढले आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने यास अधिकृत दुजोरा दिला. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेत लँडर राहिलेल्या विक्रमचा 87 दिवसांपूर्वी इस्रोशी संपर्क तुटला होता. तेच शोधून काढण्यात नासा आणि संबंधित युवकाने संयुक्त कामगिरी केली आहे. नासाने आपले ऑर्बिटर एलआरओमधून घेतलेली काही स्पष्ट छायाचित्रे प्रसारित केली आहेत. यामध्ये विक्रम धडकल्याचे ठिकाण आणि सभोवताल विखुरलेले तुकडे दिसून येत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, शणमुग सुब्रह्मण्यमने 3 ऑक्टोबर रोजीच एक ट्विट करून हा दावा केला होता. त्यास आता नासाने अधिकृत दुजोरा देत शणमुगला धन्यवाद म्हटले आहे.