आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारताच्या जीडीपीत विमा क्षेत्राचे योगदान केवळ ३.४% असल्याने विस्ताराला खूप वाव आहे. नाेकरी व करिअर विकासावरून बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी, विक्रमजित सिंग यांनी दैनिक “भास्कर’शी चर्चा केली.
> विविध पदांवर आपल्या कंपनीस कोणत्या प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता असते?
विमा क्षेत्रात प्रामुख्याने ग्राहकांशी समोरासमोर चर्चा होते तेव्हा आम्ही ग्राहकांची समज असणाऱ्या उमेदवारांचा शोध घेत असतो. आम्ही त्यांच्यात स्नेहसंबंध बनवण्याची क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य पाहतो.
शिक्षणाशिवाय वेगवेगळे क्षेत्र व अनुभवी लोकांची गरज असते. निर्णय घेण्याची क्षमता या क्षेत्रात जास्त महत्त्वाची भूमिका बजावते.
> तुमच्या अनुभवानुसार आणि फ्रेशर्ससाठी या क्षेत्रात विकासाच्या कोणत्या शक्यता आहेत?
विमा वैविध्याचे क्षेत्र आहे आणि यात खूप संधी आहेत. विक्री, परिचालन, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापनासह सर्व क्षेत्रांत संधी आहेत. भारतात प्रथम हे क्षेत्र शहरांपर्यंत मर्यादित होते. आता ते वेगाने लहानमोठ्या गावांत वाढत आहे. त्यामुळे संधीही वाढतील.
> नोकरी करू इच्छिणाऱ्यांना मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे?
नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांनी प्रथम कंपनीबाबत रिसर्च केला पाहिजे. त्यांना उद्योग व क्षेत्रात सुरू असलेल्या ट्रेंड आणि आकड्यांबाबत चांगली माहिती असायला हवी. यासोबत त्यांना नोकरीतील पद व जबाबदारीची माहिती असायला हवी.
> तुम्हाला कंपनीत कोणत्या विभागात सर्वात जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे?
सेल्स, ऑपरेशन्स, क्लेम मॅनेजमेंट, अंडररायटिंग, एचआर आणि फायनान्ससारख्या क्षेत्रांत बऱ्याच संधी आहेत. याशिवाय अॅनालिटिक्स, टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आदीत आव्हानात्मक संधी आहेत.
> तुमच्या कंपनीत कर्मचाऱ्यांकडे एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्याची संधी असते?
आमच्याकडे एक बळकट आराखडा आहे, जो संधी देतो आणि त्याच्या नव्या भूमिकेला मदत करतो. अनुभवानुसार कंपनीत कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात गेल्याने दोघांना फायदा मिळतो.
> आर्टििफशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगमुळे विमा क्षेत्रात काय बदल होत आहे?
प्रॉडक्ट डिझाइन आणि विक्री डिझाइन बनवण्याच्या हिशेबाने डेटातून खूप चांगली माहिती प्राप्त होते. तंत्रज्ञानाने विक्री वाढवण्यास मदत मिळते आहे.
> बाजाराती स्थिती चांगली नाही आणि मरगळीची चर्चा असताना उमेदवाराने स्वत: कसे तयार करायला हवे असे वाटते?
प्रत्येक अर्थव्यवस्थेत चढ-उतार येतात. एक जॉब प्रोफाइल किंवा कौशल्याऐवजी उमेदवाराकडे नवे कौशल्य शिकण्याची कायम असली पाहिजे. उमेदवारास वेळेनुसार नव्या कौशल्यावर भर दिला पाहिजे आणि आपल्या सध्याच्या
ज्ञानात बाजाराच्या गरेजनुसार वाढ करावयास हवी. असे केल्यास उमेदवारास यश मिळू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.