आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोगलाईत हिंदू नष्ट झाले का? मग भाजपपासून मुस्लिमांना धोका कसा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजबिहेडाचे रहिवासी अब्दुल रशीद रोज रेडिओ, टीव्ही व वृत्तपत्रांत राजकीय बातम्या वाचतात. चर्चांतही त्यांना रस आहे. मग त्या चावडीवरच्या असो की त्यांच्या बेकरीमधील. किंवा ज्या रेल्वेने ते जम्मूला निघाले त्या डब्ब्यातील. ते एक सामान्य नागरिक असून त्यांचे राजकीय विचार असे आहेत. -
कुणाची सत्ता येईल?
मुफ्ती साहब, इंशा अल्लाह.
का?
काँग्रेसने तर राज्याची फसवणूक केली
कशी?
ते इथं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या गप्पा करतात आणि दिल्लीत दुसरीच खोटी विधानं करतात.
मोदी आणि भाजप?
अल्लाह शपथ. या वेळी तेच पीएम बनणार.
कसे काय?
ते खरे आहेत. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, असं ते जाहीरपणे सांगतात.
मग मोदी काश्मीर प्रश्न सोडवतील का?
हा प्रश्न अखेरपर्यंत सुटणार नाही.
राज्याचा विकास होईल का?
मॅडम.. ही प्रगती तुमच्या घरीच घेऊन जा. सगळी फसवेगिरी आहे. आम्हाला शांतता हवी आहे. बस्स.
रेल्वेच्या वेगासोबत चर्चेलाही अधिक गती आली. व्यवसायाने वकील असलेले एजाज मेहराब आपले पिता रशीद यांच्यासोबत जम्मूला चालले होते. त्यांना विचारले, ‘काँग्रेस धर्मनिरपेक्ष आणि भाजप जातीयवादी आहे का?’ त्यावर ते उत्तरले, ‘मोगलाईत सर्व हिंदू नष्ट झाले होते का, मग भाजपचे सरकार आल्यास मुस्लिमांना काय धोका असेल?’ दुसरा प्रश्न होता, ‘केजरीवालांचे काय होणार?’ यावर ते म्हणाले, ‘केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापूर्वी जी घोटाळ्यांची कागदपत्रे दाखवत होते, ती आज कुठे आहेत?’ रशीद यांनी नाण्याची दुसरी बाजू उलगडली, ‘काश्मीरमध्ये ग्रामीण मतदार मुख्य आहे आणि केजरीवालांचा पक्ष फक्त शहरापुरता मर्यादित आहे. मग जिंकणार कसे?’ लाल चौकात ऊर बडवत आंदोलन करणारांप्रमाणे रशीददेखील आता संतापले होते. म्हणाले, ‘अल्लाह करे बीजेपी जिते.. काँग्रेस पूर्ण नष्ट व्हावे. आमच्या पिढ्या त्यांनी बरबाद केल्या. काँग्रेस नेत्यांनी आम्हाला पाकिस्तानी बनवले. हवं तर सच्चर अहवाल पाहा. भाजप म्हणते, 370 कलम रद्द करू. पण असे करण्याची कुणाचीही हिंमत नाही.’ वडिलांचा राग समजत एजाज म्हटले,‘नेते निवडणुकीत एक वक्तव्य करतात आणि जिंकल्यावर वेगळाच सूर लावतात. सगळे पक्ष सारखेच असतात. यावेळचे निकाल अनपेक्षित असतील. आजवर काँग्रेसला मत दिले. या वेळी मोदींना देऊन पाहू. सगळ्यांनाच संधी मिळाली पाहिजे.’
जम्मूतील उद्योजक विजयकुमार चर्चेवर नाराज दिसले. असंतोषाने म्हणाले, ‘आता काँग्रेसला काहीही किंमत उरली नाही. सत्ता जाऊ द्या. मग कळेल. भाजप मोदींच्या नावाने मते मिळवेल आणि पंतप्रधान बनवण्याची वेळ आली तर अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशींचे नाव पुढे येईल. मोदी तरी कुठे धुतल्या तांदळाचे आहेत? दिसतात तसे नाहीत. फेकू आहेत. काँग्रेस भ्रष्ट तर मोदी साम्राज्यवादी मनोवृत्तीचे आहेत.’ दुसरा पैलू उलगडत पवनदीप म्हणाले, ‘काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये फूट पाडून राज्य केले. राज्यकर्त्यांना झुकते माप दिले. जम्मूवाल्यांचे शोषण केले. मोदींमुळे काश्मीर भाजपला मत देण्यास उत्सुक आहे. मग एकत्र येण्यास काय हरकत? सगळेच पक्ष सारखेच आहेत. इथं शायर फराज यांची नज्म तंतोतंत लागू होते. ..
‘‘बरबाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी है,
हर शाख पे उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या होगा?’’
- पुढील स्टेशन लखनौ..