आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Interview : Sundar Pichai Said: Alphabet Companies Will Come To India For Jobs And FDI

सुंदर पिचाई म्हणाले- नाेकऱ्या, एफडीआयसाठी अल्फाबेट कंपन्या भारतात येतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफाेर्नियातून सिद्धार्थ राजहंस गुगलची पॅरंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ झाल्यानंतर सुंदर पिचाई यांना दैनिक भास्करने आपल्या लाखाे वाचकांतर्फे शुभेच्छा दिल्या. आम्ही पिचाई यांना बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील तिसरी सर्वात माेठी कंपनी अल्फाबेटच्या भविष्यातील आणि भारतातील त्यांच्या याेजनांबद्दल विचारले.त्यावर त्यांनी जे काही सांगितले ते त्यांच्याच शब्दांत... जगभरातील आमच्या हितचिंतकांकडून मिळत असलेल्या शुभेच्छांबद्दल मी खूप आभारी आहे. दैनिक भास्करच्या माध्यमातून असणाऱ्या अपार प्रेमाबद्दल आणि त्यांच्या प्रेमळपणाबद्दल मी सर्व भारतीय वाचकांचे आभार मानतो. माझ्यासाठी हे आनंददायी क्षण आहेत. आपल्याला माहिती आहे की, मी एका नवीन भूमिकेच्या दिशेने जात आहे. मी इथे एका गाेष्ट स्पष्ट करू इच्छिताे की यामुळे आमच्या कामाचे डायनॅमिक्स (गती) बदलणार नाही आणि बुधवारपासून मी पूर्वीप्रमाणे तसेच काम करत राहीन. तथापि आता माझ्यावर ग्रुप हाेल्डिंग आणि गुंतवणुकीची अतिरिक्त जबाबदारी असेल.  हा नवीन बदल लॅरी आणि सर्गेई यांचे पराेपकार आणि नि:स्वार्थी भूमिककेशिवाय शक्य हाेणार नाही. त्यांना आता व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपली भूमिका जास्त पकडून ठेवायची नाही आणि मला एक प्रकारे आपला उत्तराधिकारी मानतात.  सहसंस्थापक आणि संचालक मंडळाचे सदस्य या नात्याने लॅरी आणि सर्गेई आमचा एक अविभाज्य घटक म्हणून कायम राहतील व त्याहीपेक्षा जास्त म्हणजे माझे व्यक्तिगत मित्र आणि मार्गदर्शकाच्या रूपाने आमची टीम तशीच कायम राहील, जी आज आहे .... परंतु अल्फाबेट पॅरंट कंपनी पूर्णपणे कंपन्यांचे विकसित छत्र बनले आहे. मी आमच्या अन्य कंपन्यांमधील भूमिका समताेल ठेवण्यावर भर देईन. या कंपन्यांमध्ये कॅलकाे, गुगल एक्स लॅब्ज, व्हेंचर कॅपिटल, नेस्ट, फायबर, गुगल (मुख्य व्यवसाय), जिग्साॅ, मकानी, डीपमाइंड, जीव्ही, व्हेरी, वायामाे, विंग, लून व साइडवाॅक लॅब यांचा समावेश आहे. माझ्या नवीन भूमिकेचा एक भाग नवीन तंत्रज्ञान आमच्या मुख्य व्यवसायामध्ये एकात्मिक करून त्याला साेबत घेऊन वाटचाल करणे हा माझ्या नवीन भूमिकेचा एक भाग असेल. पण सध्या गुगलमध्ये जे काही करत आहे, ते करत राहीन.भारतीय बाजारपेठेसाठी आमची वाटचाल नेहमीप्रमाणेच राहील. या वेळी गुगल आणि त्याच्या सेवांव्यतिरिक्त आमचे लक्ष  अल्फाबेट कंपनी भारतात आणण्याकडे असेल.मी माझ्या क्षमतेनुसार माझी सर्वश्रेष्ठ कामगिरी करून दाखवेन, पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद... - सुंदर पिचाई

पिचाई सीईओ झाल्यावर कंपनीच्या शेअरमध्ये २ % वाढ


सुंदर पिचाई गुगलची पॅरंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.८७ टक्क्यांनी वाढ झाली. शेअरमध्ये वाढ झाल्याने गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्या नेटवर्थमध्ये बुधवारी ११६ डाॅलरची (८,२९७ काेटी रु) वाढ झाली. दुसरे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांना ११३ काेटी डाॅलरचा (८,०८२ काेटी रु.) फायदा झाला. पेज यांनी अल्फाबेटचे सीईओ आणि ब्रिनने मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सुंदर अल्फाबेटचे सीईओ बनण्याच्या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी सकारात्मक स्वागत केले.